मुंबई - World Plastic Surgery Day 2024: 15 जुलै रोजी जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवसाचा जागतिक उत्सव साजरा केला जात आहे. जगभरात प्लास्टिक सर्जरीमध्ये अनेक बदल घडलेले असून लोक याचा लाभ घेत आहेत. यामध्ये भारतीय लोक विशेषतः सेलेब्रिटींचा वाढता सहभाग पाहायला मिळतो.
असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक सर्जन ऑफ इंडिया (APSI) यांच्या वतीनं 2011 मध्ये सुरू करण्यात आलेला, राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिवसाची सुरुवात केली होती. यामध्ये देशातील प्रत्येक प्लास्टिक सर्जनने एक विनामूल्य शस्त्रक्रिया केली, ज्यामुळे गरजू असंख्य व्यक्तींना फायदा झाला. गेल्या काही वर्षांमध्ये, हा उपक्रम वाढला आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता आणि जागतिक वैद्यकीय समुदायांकडून या दिवसाला पाठिंबा मिळाला आहे.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जरी (IASPS) कडील अलीकडील डेटा या क्षेत्रातील भारताचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करणारा आहे. 3,000 तज्ञांसह, भारत जगातील प्लास्टिक सर्जनच्या संख्येत 5 व्या क्रमांकावर आहे. शिवाय, दरवर्षी अर्धा दशलक्षाहून अधिक शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया प्रक्रियेत देशाचा सहभाग जगभरात 7 व्या स्थानावर पोहोचला आहे.
कॉस्मेटिक प्रक्रियेसाठी सेलिब्रिटींचा प्रभाव
प्रियांका चोप्रा जोनास, अनुष्का शर्मा आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रभावानं कॉस्मेटिक प्रक्रियेला चालना मिळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राइनोप्लास्टीपासून ते ओठ वाढविण्यापर्यंतच्या शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे.
चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे. गेल्या काही वर्षांत, अनेक कलाकारांनी केवळ शस्त्रक्रियाच केली नाही तर सार्वजनिक व्यासपीठावर याबद्दल भाष्य केलं आहे. जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त सर्जरी केलेल्या काही भारतीय सेलिब्रिटींची यादी आपण पाहू शकतो.
1. प्रियांका चोप्रा जोनास - माजी मिस वर्ल्ड आणि आता ग्लोबल स्टार, प्रियांकाने विचलित सेप्टम सुधारण्यासाठी राइनोप्लास्टी केल्याचे कबूल केलं आहे. हॉवर्ड स्टर्न शोमध्ये हजेरीदरम्यान देसी गर्लनं याबद्दल सांगितलं. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस, डॉक्टरांनी तिला नाकाच्या कालव्यातील पॉलीप काढण्याचा सल्ला दिल्यानंतर तिच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
2. अनुष्का शर्मा हिनं ओठ फिलर्स मिळाल्याची कबुली दिली आहे. तिने एका आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुलाखतीत "लिप जॉब" मिळाल्याची कबुली दिली.