मुंबई - Ayushmann khurrana and tahira kashyap : अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. कॉलेजच्या दिवसात आयुष्माननं ताहिरा कश्यपला डेट करायला सुरुवात केली होती. आता दोघांच्या लग्नाला 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आयुष्मान एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच चांगला पतीदेखील आहे. अनेक प्रसंगी दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त, आयुष्माननं आपल्या पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ताहिरा आहे. ताहिराला 2018 मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झाले होते. हा काळ आयुष्मान आणि ताहिरा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण होता.
आयुष्मान खुरानानं शेअर केले फोटो : 2019 मध्ये ताहिराला 'स्टेज 0' स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर तिच्यावर मॅस्टेक्टॉमी प्रक्रिया झाली. यानंतर ती यामधून सावरली आहे. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयुष्मान खुरानानं पत्नीला समर्पित पोस्ट शेअर केली आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयुष्मान खुरानानं एक सुंदर नोट लिहिली आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरच्या पहिल्या फोटो तो आपल्या पत्नीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ताहिराच्या शस्त्रक्रियेच्या खुणा दिसत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या फोटोत ताहिरा दिसत आहे. या पोस्टवर आयुष्माननं लिहिलं, ''ज्या मुलीला मी पंजाब विद्यापीठातील खोली क्रमांक 14 मध्ये समोसे खाताना आणि चहा पिताना पाहिले. तिच्यावर मी मनापासून प्रेम करतो''.