मुंबई - Sidharth Malhotra Yodha BTS video :चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहात आहेत. आता सिद्धार्थ त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. तो सतत 'योद्धा' चित्रपटाच्या संबंधित काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, सिद्धार्थनं पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे दिग्दर्शित 'योद्धा' या आगामी चित्रपटाची बीटीएस (BTS) (पडद्यामागील) झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आता सिद्धार्थ 'योद्धा' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रानं शेअर केला व्हिडिओ : दरम्यान सिद्धार्थनं 'योद्धा'चा बीटीएस व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''लाइट्स, कॅमेरा आणि...कामामागील एक झलक...अरुण कात्याल आणि इतर सर्वजणांबरोबर 'योद्धा'मध्ये असणं खूप छान वाटलं.'' याशिवाय चित्रपटाची रिलीज डेट त्यानं या पोस्टमध्ये लिहिली आहे. 'योद्धा' चित्रपट 15 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रानं पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो ॲक्शन स्टाईलमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक ॲक्शन सीन्स आहेत. त्याचे हाय-ऑक्टेन स्टंट हे खूप थरारक आहेत.