महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आलिया भट्टच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त आलिशान डिनर पार्टीचे आयोजन - Alia Bhatt Cozy Birthday Dinner

आलिया भट्टने आपला 31 वा वाढदिवस अतिशय थाटात साजरा केला. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांसाठी तिनं एका आलिशान डिनर पार्टीच आयोजन केलं होतं. यासाठी रणबीर कपूर, नीतू कपूर, इशा आणि आकाश अंबानी उपस्थित होते.

Alia Bhatt
आलिया भट्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 10:41 AM IST

मुंबई - आलिया भट्टने तिचा 31 वा वाढदिवस रणबीर कपूर, ईशा अंबानी, आकाश अंबानी, नीतू कपूर आणि शाहीन भट्ट यांच्यासह तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह साजरा केला. त्यांनी मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये एका आलिशान डिनर पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी आलिया चकचकीत कॉर्सेट आणि निळ्या पँटमध्ये खूपच देखणी दिसत होती. रणबीरने काळ्या रंगाचा पोशाख परिधान करुन साधेपणाने स्वतःला सजवले होते. या पार्टीतील काही क्षण आणि व्हिडिओ पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केले आहेत.

गेल्या वर्षी आलियाने आपला 30 वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. त्यावेळी तिच्या बरोबर रणबीरकपूर आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

तिच्या कामाच्या आघाडीबद्दल बोलायचे तर,आलिया भट्टने अलीकडेच 'पोचर' या वेब सिरीजची निर्मिती केली होती. हत्तींच्या शिकारीवर आधारित या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 'पोचर' मालिका 23 फेब्रुवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. माफक प्रमोशन केले असतानाही ही मालिका आकर्षक कथानक आणि अनुकूल प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसली. रिलीजच्या एका दिवसानंतर, आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया हँडलवर मालिकेला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला होता. मालिकेच्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल प्रेक्षकांबद्दल उत्साह आणि कृतज्ञता शेअर केली. मालिका रिलीज झाल्यानंतर एका दिवसात, पोचर भारतात प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याचे तिने निदर्शनास आणून दिले आणि तिने लिहिले, "रिलीज झाल्यानंतर एका दिवसातच, पोटर भारतात नंबर 1 बनला आहे! मिळालेल्या प्रेमासाठी खूप रोमांचित आणि उत्साहित! ज्यांनी अद्याप पाहिले नाही त्यांच्यासाठी प्राईम व्हिडिओवर आता पहा."

आलिया भट्टने अलीकडेच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंग बरोबर दिसली होती. तिने गॅल गॅडॉटसोबत 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. येत्या काळात ती सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' या चित्रपटात काम करणार आहे. वेदांग रैना बरोबर या चित्रपटाची नायिका असणारी आलिया करण जोहरच्या बरोबरीनं या चित्रपटाची सहनिर्माती म्हणून काम करत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये रणबीर आणि विकी कौशल यांच्यासह आलिया भट्ट दिसणार आहे. ख्रिसमस 2025 मध्ये रिलीज होणार असलेला हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी फ्लोरवर जाईल असे म्हटले जाते.

हेही वाचा -

  1. "सर्वांचा खूप अभिमान वाटला", म्हणत कियारा अडवाणीनं केलं पती सिद्धार्थच्या 'योद्ध्या'चं कौतुक
  2. Bhool Bhulaiya 3 Shoot: पाय फ्रॅक्चर असतानाही अनीस बज्मी करतोय 'भूल भुलैया 3' चे शुटिंग, कार्तिक आर्यनचा प्रेरणादायी अनुभव
  3. Aamir Khan Birthday Special: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे संस्मरणीय कॉमिक चित्रपटांचे सेलिब्रेशन

ABOUT THE AUTHOR

...view details