मुंबई - Alia Bhatt Summer Outfit :उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. आता आलिया भट्ट नुकतीच पांढऱ्या शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली होती. तिचा हा लूक उन्हाळ्यासाठी योग्य असल्याचं आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन म्हणत आहे. उन्हाळ्यात काय परिधान करावे याविषयी अनेकांना त्यांच्या आउटफिट्सबद्दल संभ्रम असतो. बरेच लोक त्यांच्या आउटफिट स्टाईलसाठी बॉलीवूड स्टार्सना फॉलो करतात, तर सेलेब्स देखील त्यांच्या चाहत्यांसाठी दररोज नवनवीन स्टाइल स्टेटमेंट देत असतात. आता आलियाचा पांढऱ्या शर्ट आणि शॉर्ट्समधील हा लूक अनेकांना आवडला आहे.
आलियाचा हा आउटफिट उन्हाळ्यासाठी परफेक्ट :आता आलियाच्या या फोटोवर एकानं कमेंट्स करत लिहिलं, "आलिया नेहमी सुंदर ड्रेस परिधान करत असते, तिची स्टाईलही खूप सुंदर आहे." दुसऱ्या एकानं या फोटोवर लिहिलं, "मला आलिया खूप आवडते, ती खूप सुंदर दिसत आहे." आणखी एकानं लिहिलं, "बॉलिवूडची क्वीन आलिया भट्ट खूप देखणी आहे." अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. आलियाचा समर लूक एकदम परफेक्ट दिसत आहे.