मुंबई - Vikrant Massey Son Name Tattoo: विक्रांत मॅसीनं 'ट्वेल्थ फेल' चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयानं सर्वांनाचं खूप प्रभावित केलं आहे. 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटाचं चाहत्यांपासून तर सेलिब्रिटींनी खूप कौतुक केलं आहे. आता विक्रांत मॅसी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदी आहे. विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरनं यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. आता त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विक्रांतनं आपल्या मुलाचे नाव आणि जन्मतारखेचा टॅटू हातावर गोंदवला आहे. हा टॅटू खूप आकर्षक आहे. या फोटोच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'अॅडीक्शन ऑर अॅडीक्शन मला दोन्ही आवडतात.'' याशिवाय त्यानं या पोस्टमध्ये हार्ट इमोजीही जोडला आहे.
विक्रांत मॅसीची कारकीर्द :विक्रांत मॅसी हा अनेकदा आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत असतो. त्याचे सोशल मीडियावर 2.5 मिनियन फॉलोअर्स आहेत. 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटामुळे विक्रांत हा प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. त्यानं छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानं 'धूम मचाओ धूम' (2007) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये स्वताचं नाव बनविण्यासाठी खूप संघर्ष केला. यानंतर त्यानं 'धरम वीर' (2008), 'बालिका वधू' (2009-2010) आणि 'कुबूल है' (2013) यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं. इथूनचं त्याला एक ओळख मिळाली. यानंतर त्यानं 'लूटेरा' (2013), 'दिल धडकने दो', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा', 'कॉपी', 'हसीन दिलरुबा', 'गॅसलाइट', '१४ फेरे ' आणि 'ट्वेल्थ फेल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.