महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

थलपथी विजय स्टारर 'गोट' रुपेरी पडद्यावर झळकला, जगभरातील चाहते खुश - Vijay Thalapathy - VIJAY THALAPATHY

GOAT : थलपथी विजय स्टारर चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' आता थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे.

GOAT
गोट (विजयचा गोट चित्रपट (ANI VIDEO))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 3:52 PM IST

चेन्नई GOAT: थलपथी विजय स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'गोट' (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) आज 5 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विजयची दुहेरी भूमिका आहे. विजय या चित्रपटात वडील आणि मुलाची भूमिका साकारत आहे. दरम्यान विजयचे चाहते 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते, जेव्हा चित्रपटाची रिलीज डेट आली तेव्हा चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. आता 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'च्या रिलीजचा आनंद साजरा करण्यासाठी, विजयच्या चाहत्यांनी रस्त्यावर आणि चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले आहेत.

गोट (विजयचा गोट चित्रपट (ANI VIDEO))

'गोट' चित्रपट प्रदर्शित :'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजयच्या चाहत्यांचे चेहरे उजळून आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांच्या बाहेर खूप गर्दी होताना दिसत आहे. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, यामध्ये विजयचे चाहते खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. याशिवाय काही चाहते, चित्रपटाच्या पोस्टरची पूजा करताना दिसत आहेत. अनेक चाहते बॅन्डवर डान्स करून आपला आनंद व्यक्त करत आहेत. 'गोट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणार असा अंदाज आता अनेकजण व्यक्त करत आहेत. याशिवाय काही चाहते या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून विजयचं कौतुक करताना दिसत आहेत.

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपटाबद्दल : 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या चित्रपटाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलंय. 'गोट' एक ॲक्शन, सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात विजय व्यतिरिक्त अभिनेत्री मीनाक्षी चौधरी मुख्य भूमिकेत आहे. बाकी स्टारकास्टमध्ये प्रभुदेवा, प्रशांत, राघल लॉरेन्स यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'गोट'चं बजेट 300 ते 400 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'ची आगाऊ बुकिंग कमाई दर्शवते की चित्रपट पहिल्या दिवश 100 कोटींहून अधिक व्यवसाय करू शकतो. या तमिळ चित्रपटाची निर्मिती कलापती एस अघोराम, एस गणेश, कलापती एस सुरेश यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. थलपथी विजय स्टारर 'गोट'च्या मॉर्निंग शोसाठी याचिका दाखल, निर्णय येणं बाकी - vijay Movie
  2. थलपथी विजय स्टारर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं यूकेमध्ये होईल द लाईट थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग - thalapathy vijay film'
  3. थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त G.O.A.T चा थरारक अ‍ॅक्शन टीझर लॉन्च - Thalapathy Vijay birthday

ABOUT THE AUTHOR

...view details