महाराष्ट्र

maharashtra

डेब्यू प्रोडक्शन 'क्रॅक'सह करोडो गमावल्यानंतर विद्युत जामवाल फ्रेंच सर्कसमध्ये झाला सामील - VIDYUT JAMMWAL

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 4:42 PM IST

Vidyut jammwal : अभिनेता विद्युत जामवालनं 'क्रॅक'च्या फ्लॉपनंतर आर्थिक नुकसान झाल्याचं एका मुलाखतीत सांगितलं आहे. यानंतर विद्युत जामवाल हा सर्कसमध्ये सामील झाल्याचं समोर आलंय.

Vidyut jammwal
विद्युत जामवाल (Vidyut Jammwal (ANI/ETV Bharat))

मुंबईVidyut jammwal : अभिनेता विद्युत जामवालचा 'क्रॅक' चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला. या चित्रपटामुळे त्याचं खूप नुकसान झालं आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, त्याचं कोट्यवधींचं नुकसान झालंय, परंतु त्यानं तीन महिन्यांनंतर हे त्याचे पैसे भरुन काढले आहेत. त्यानं तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या. विद्युतचं आर्थिक नुकसानानंतर, तो फ्रेंच सर्कस मंडळात सामील झाला. यामधून तो तेथील कलाकारांकडून बरेच काही शिकला.

विद्युत जामवाल सर्कसमध्ये सामील झाला : विद्युतनं सांगितलं की, चित्रपटाच्या अपयशानंतर त्यानं बरेच पैसे गमावले. त्यानं पुढं म्हटलं, "माझी खरोखर ज्यांना काळजी आहे, अशा मित्रांकडून सल्ला घेणं, माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. 'क्रॅक'च्या प्रदर्शनानंतर मी फ्रेंच सर्कसमध्ये सामील झालो आणि या अद्भुत माणसांबरोबर सुमारे 14 दिवस घालवले." याशिवाय त्यानं पुढं म्हटलं, "क्रॅक'नं अपेक्षेप्रमाणं कामगिरी केली नाही. दरम्यान फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 45 कोटी रुपयांच्या बजेटच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर सुमारे 17 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट विद्युतचा बॉक्स ऑफिसवर सलग दुसरा कमी कामगिरी करणारा चित्रपट ठरला आहे.

विद्युत जामवालचं झालं आर्थिक नुकसान : त्यानं यावेळी सांगितलं की, "मी खूप पैसे गमावले. एक कलाकार असा आहे, जो त्याच्या शरीराला काही विशिष्ट स्तरांवर ढकलू शकतो. म्हणून, जेव्हा मी एखाद्या कलाकाराला पाहतो, तेव्हा माझ्या मनात असे होते, अरे देवा, कोणीतरी असे कसे असू शकते?' मी त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला आणि मुंबईला परत येईपर्यंत सगळं शांत झालं." दरम्यान विद्युत हा जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हा त्यानं केरळमधील पलक्कड येथील एका आश्रमात कळरीपयट्टचं प्रशिक्षण घेतलं. बॉलिवूडच्या टॉप ॲक्शन हिरोंच्या यादीत तो आता सामील आहे. विद्युत जामवालनं सलमान खानच्या 2004 मध्ये आलेल्या 'दिल ने जिसे अपना कहा' चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानं 'कमांडो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

हेही वाचा :

  1. 'बालिका वधू' फेम अविका गोरनं 'या' चित्रपटातून केलं होत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण - avika celebrating her birthday
  2. विराटच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी वाल्मिकाला काय सांगितलं? अनुष्का शर्मानं शेअर केली पोस्ट - Anushka Sharma Shares post
  3. सेलिब्रिटींकडून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव, पहा कोण काय म्हणाले? - INDIA T20 WORLD CUP WIN

ABOUT THE AUTHOR

...view details