मुंबई - Katrina Kaif Birthday :बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज 16 जुलै रोजी 41 वर्षांची झाली आहे. या खास दिवशी तिला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अलीकडेच तिचा पती अभिनेता विकी कौशलनं तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकीनं या खास प्रसंगी थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. 16 जुलै रोजी विकी कौशलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपल्या सुंदर पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला. या फोटोंमध्ये दोघांमध्ये खास बॉन्ड असल्याचं दिसत आहे. या पोस्टवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुझ्याबरोबर चांगल्या आठवणी बनवणे हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव."
विकी कौशलनं शेअर केले फोटो : कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त विकी कौशलनं सुंदर फोटो शेअर केल्यानंतर, आता अनेक चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय विकीनं लग्नामधील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये विकी हा आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसत आहे. एका फोटोमध्ये विकी आणि कतरिना हे दोघेही देवाजवळ प्रार्थना करताना दिसत आहेत. याशिवाय आणखी एका फोटोमध्ये दोघेही बिचवर एंजॉय करताना करत आहेत. विकीनं शेअर केले फोटो अनेकांना पसंतीस उतरत आहेत. या जोडप्याच्या फोटोला अनेकजण 'लाईक'चा देत आहेत.