मुंबई - Ishita Dutta And Vatsal Sheth : प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपे इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी प्रथमच मुलाचा चेहरा जगासमोर आणला. या जोडप्यानं मुलगा वायुच्या पहिल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी एक कौटुंबिक फोटो शेअर केला. सोशल मीडियावर काही चाहते त्यांच्या परफेक्ट फॅमिली फोटोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. इशिता आणि वत्सल हे 19 जुलै 2023 मध्ये आई-वडील झाले. त्यावेळी इशिता आणि वत्सलनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची गोड बातमी दिली होती.
गुपचूप लग्न करणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्याच्या मुलाचा फोटो पाहिला का? वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट - vatsal sheth - VATSAL SHETH
Ishita Dutta And Vatsal Sheth : अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्तानं पहिल्या वाढदिवसानिमित्त मुलाचा चेहरा सोशल मीडियात शेअर केला. आता अनेकजण वत्सलच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Published : Jul 21, 2024, 12:17 PM IST
इशिता आणि वत्सल यांनी मुलगा वायुचा चेहरा दाखवला : इशिता दत्ता आणि वत्सल सेठनं शेअर केलेला हा फोटो अनेकांना आवडत आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे वायुबरोबर खूप आनंदी दिसत आहे. फोटोत वायू कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहे. दरम्यान 19 जानेवारी रोजी या दोघांनी त्यांचा मुलगा वायूचा अन्नप्राशन संस्कार केला होता. आता इशिता आणि वत्सलचा मुलगा हा 1 वर्षाचा झाला आहे. हा फोटो शेअर करताना इशिता दत्तानं यावर लिहिलं, "वायूचा काल वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात सध्या कुटुंब खूप व्यग्र आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या बाळा. माझा विश्वासच बसत नाही की तू 1 वर्षाचा झाला आहेस... तुला खूप आनंद आणि प्रेम मिळो... वायु मम्मा-पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात."
इशिता आणि वत्सलच्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : इशिता आणि वत्सलच्या मुलाला बॉलिवूड स्टार बॉबी देओल, हेली शाह, युविका चौधरी यांना फोटोवर कमेंट करून भरभरून प्रेम दिलंय. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे मनोरंजन विश्वातील सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडप्यापैकी एक आहेत. दोघांची भेट 'रिश्तों का सौदागर-बाजीगर'च्या सेटवर झाली होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं.