मुंबई - Uorfi Javed : आपल्या विचित्र कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेली टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का बसेल की, तिच्या चेहऱ्याला एक प्रकारे दृष्ट लागली आहे. उर्फीनं आज, 3 जून रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या चेहऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा चेहरा खूप सुजलेला दिसत आहे. तिच्या डोळ्यांवर आणि गालावरही सूज जिसत आहे. आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता उर्फीच्या चेहऱ्याला नेमकं झालं काय याबद्दल आम्ही तुम्हाला आमच्या लेखामधून सांगणार आहोत.
उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल : बऱ्याच दिवसांपासून उर्फी जावेदला तिच्या फिलर्सबद्दल कमेंट येत होत्या. लोक तिच्या फोटोवर आणि व्हिडिओंवर कमेंट करत होते की ती सुंदर दिसण्यासाठी इम्प्लांट आणि फिलर्स वापरते. पण उर्फी जावेदनं तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमधील फोटोमध्ये जे दाखवलं ते पाहून लोकांना धक्का बसला आहे. उर्फीन काही फोटो शेअर करत लिहिलं की, "माझ्या चेहऱ्यावर असंख्य प्रतिक्रिया केल्या गेल्या आहेत मी माझ्या फिलर्सला खूप दूर केल आहे. मला गंभीर ॲलर्जी आहे. बहुतेक वेळा माझा चेहरा सुजलेला असतो. प्रत्येक दिवशी असेच होत आहे. मला नेहमीच खूप वेदना होतात."
उर्फी जावेदवर उपचार सुरू :सध्या उर्फीवर उपचार सुरू आहेत. उर्फीनं पोस्टद्वारे पुढं सांगितलं की, "फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर जे दिसत आहे ते फिलर्स नसून ॲलर्जी आहे. उर्फी जावेदनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की तिची इम्युनोथेरपी सुरू आहे. यानंतर तिनं पुढं लिहिलं, "पुढच्या वेळी जर तुम्ही मला सुजलेल्या चेहऱ्यानं पाहिलं तर समजा की मी माझ्या ॲलर्जीच्या दिवसातून जात आहे. मी वयाच्या 18व्या वर्षापासून घेत असलेल्या माझ्या सामान्य फिलर्स आणि बोटॉक्सशिवाय काहीही केले नाही. कमेंट सेक्शनमध्ये तिचे चाहते फॉलोअर्स भावूक झाले आहेत आणि ती लवकर बरी होणार असल्याची तिला हिम्मत देत आहेत. याशिवाय तिनं लिहिलं, "पुढच्या वेळी जर तुम्हाला माझा चेहरा सुजलेला दिसला तर मला फिलर्स न घेण्याचा सल्ला देऊ नका, फक्त माझ्याबद्दल थोडी सहानुभूती बाळगा." आता तिचे चाहते तिला नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दोत आहेत.
हेही वाचा :
- किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If
- रवीना टंडन पार्किंग प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, केली पोस्ट शेअर - Kangana Ranaut
- दीपिका पदुकोण फॅमिली डिनर डेटवर आईबरोबर झाली स्पॉट, दिसली चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक - Pregnant Deepika Padukone