महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तापसी पन्नू करणार बॉयफ्रेंड मॅथियास बोएशी उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग - तापसी पन्नू

तापसी पन्नू तिचा दीर्घकाळचा प्रियकर मथियास बोए याच्यासह मार्चमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये या जोडप्याचे डेस्टिनेशन वेडिंग मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे. मॅथियास बोए हा डॅनिश बॅडमिंटन प्रशिक्षक आहे.

Taapsee Pannu
तापसी पन्नू

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 2:39 PM IST

Updated : Feb 28, 2024, 4:30 PM IST

मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नू विवाह बंधनात अडकणार असल्याची खात्रीशीर बातमी आहे. तापसी आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर मॅथियास बोए जवळजवळ एक दशक एकत्र असल्याचे म्हटले जाते आणि हे जोडपे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांचा विवाह सोहळा मार्च अखेरीस उदयपूरमध्ये एका छोटेखानी समारंभात पार पडेल. या विवाह कार्यक्रमाला बॉलिवूड सेलेब्रिटींना निमंत्रण दिले जाणार नसल्याचे समजते.

तापसी पन्नू आणि मॅथियास बोए यांचा विवाह शिख आणि ख्रिश्चन रितीरिवाजांचे मिश्रण असेल असा अंदाज आहे. जळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींच्या गोताळ्यात ते दोघे पती पत्नी म्हणून शपथ घेतील. त्यांच्या प्रेमाची आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीची अभिव्यक्ती म्हणून दोन्ही धर्मांच्या समृद्ध परंपरा ते एकत्र करतील.

तापसी पन्नूने विविध मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॅनिश बॅडमिंटन प्रशिक्षक मॅथियास बोए यांच्याशी असलेल्या तिच्या नातेसंबंधावर मोकळेपणाने चर्चा केली होती. जानेवारी 2023 मध्ये, तापसीने एका मुलाखतीत आदर्श लग्नासाठी तिचा दृष्टीकोन काय आहे यावरही भाष्य केले होते. तिने आपल्या चर्चेत विवाह सोहळ्यात असलेल्या नृत्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वादिष्ट जेवणाचाही उल्लेख केला होता.

विवाहामध्ये अनावश्यक नाट्यमयतेला बगल देऊन एका साध्या पण शोभिवंत एकेदिवसीय कार्यक्रमाचीही तिने इच्छा व्यक्त केली. तिने लग्नाच्या उत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंतच्या विधींविरुद्ध तिची पसंती ठामपणे सांगितली होती.

वधू म्हणून सजण्याबद्दलच्या तिच्या संकल्पनाही तिने या चर्चेत स्पष्ट केल्या होत्या. ती म्हणाली की वधू म्हणून मला नैसर्गिक केशरचना करायला आवडेल. भडक मेकअपबद्दलचा तिरस्कारही तिने बोलून दाखवला. लग्नाचा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी कोणत्याही कृत्रीम गोष्टींची निवड तिला करायची नाही.

व्यावसायिक आघाडीवर, तापसी पन्नू अलिकडे रिलीज झालेल्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये सुपरस्टार शाहरुख खानसह दिसली होती. याशिवाय, ती 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटात जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता विक्रांत मॅसी आणि सनी कौशल यांच्या बरोबर काम करणार आहे.

हेही वाचा -

  1. मुंबई विमानतळावरील सलमान खानचा छोट्या मुलांना शेकहॅन्ड करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  2. 'योद्धा'च्या ट्रेलर रिलीजपूर्वी सिद्धार्थ मल्होत्राने दिला 'अभूतपूर्व थरार' असल्याचा संकेत
  3. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज ; पाहा व्हिडिओ
Last Updated : Feb 28, 2024, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details