मुंबई Tumbbad Box Office :भारतीय बॉक्स ऑफिसवर 11व्या दिवशी, 'तुम्बाड'नं साऊथ चित्रपट 'घिल्ली'ला मागे टाकून जबरदस्त कामगिरी केली आहे. अनिल बर्वे दिग्दर्शित आणि सोहम शाह अभिनीत, 'तुम्बाड'नं चित्रपटगृहांमध्ये धमाका केला आहे. 'तुम्बाड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटानं दुसऱ्या वीकेंडनंतर रि-रिलीजमध्ये 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे.'तुम्बाड'नं साऊथ स्टार थलपती विजयच्या 'घिल्ली'ला मागे टाकल्यानंतर एक इतिहास रचला आहे. 'तुम्बाड' देशातील सर्वाधिक कमाई करणारा रि-रिलीज चित्रपट बनला आहे.
'तुम्बाड' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, रि-रिलीजमध्ये 'शोले' आणि 'टायटॅनिक'चा विक्रम मोडला - Tumbbad Box Office - TUMBBAD BOX OFFICE
Tumbbad Box Office: 'तुम्बाड' हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर, बॉक्स ऑफिसवर 'शोले' ते 'टायटॅनिक'सह काही चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.
!['तुम्बाड' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, रि-रिलीजमध्ये 'शोले' आणि 'टायटॅनिक'चा विक्रम मोडला - Tumbbad Box Office Tumbbad Box Office](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-09-2024/1200-675-22536770-thumbnail-16x9-tumbbad-box-office.jpg)
Published : Sep 25, 2024, 6:09 PM IST
'तुम्बाड'नं रि-रिलीजवर रचला इतिहास :पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटानं एकूण 33 कोटी कलेक्शन केलं. यानंतर दुसऱ्या वीकेंडमध्ये दमदार कामगिरीसह, 'तुम्बाड' जवळपास 45 कोटींच्या एकूण कलेक्शनपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. चित्रपट निर्माते व्यापक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाबद्दल देखील विचार करताना सध्या दिसत आहेत, असं झाल्यास 'तुम्बाड' हा आणखी कमाई बॉक्स ऑफिसवर करू शकेल. या चित्रपटानं मूळ रिलीजमध्ये 12 कोटींची कमाई केली होती. सध्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप वेगानं कमाई करताना दिसत आहे. 'तुम्बाड' हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये आता गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कहाणी ही प्रेक्षकांना खूप पसंत पडली आहे. अनेकजण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत.
'या' चित्रपटांना मागे टाकलं :'तुम्बाड'नं अवघ्या 10 दिवसात 26.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर रिलीजच्या 11व्या दिवशी या चित्रपटानं जोरदार नोटा छापले आहेत. 'घिल्ली' चित्रपटानं रि- रिलीजवर 26.5 कोटीची कमाई केली होती. यानंतर 'टायटॅनिक'नं 18 कोटी, 'शोले'नं 13 कोटींची कमाई केली आहे. रोमँटिक ड्रामा 'लैला मजनू'नं 45 दिवसांत 11.5 कोटी रुपये कमावले. याशिवाय 'रॉकस्टार'नं 11.5 कोटींची कमाई केली होती. 'तुम्बाड'बद्दल सांगायचं झालं तर, हा एक थ्रिलर भयपट आहे. हा चित्रपट रि - रिलीज झाल्यापासून दररोज बॉक्स ऑफिसवर याचे आकडे उत्कृष्ट असल्याचे दिसत आहेत. 'तुम्बाड'नं कल्पनारम्य तसेच विलक्षण दृश्य कथाकथनानं प्रेक्षकांना मोहित केलंय.