मुंबई : एकीकडे संपूर्ण बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री ख्रिसमस सेलिब्रेट करत आहे. दुसरीकडे, साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णननं सोशल मीडियावर अशी बातमी शेअर केली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसेल. आपल्या 'मुलाच्या' निधनाची बातमी त्रिशानं आता चाहत्यांना दिली आहे. त्रिशा कृष्णनच्या घरातील झोरो नावाच्या श्वानचं निधन झाल्यानंतर ती सध्या दु:खात आहे. त्रिशानं सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करताना लिहिलं, 'माझा मुलगा झोरो'चं ख्रिसमसच्या सकाळी निधन झालं. जे लोक मला ओळखतात त्यांना माहित आहे की आता माझ्या आयुष्याचा अर्थ शून्य आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या शॉकमध्ये आहोत. कामावरून काही दिवस सुट्टी घेणार आणि रडारपासून थोडी दूर होईल.'
त्रिशा कृष्णनच्या श्वानचं निधन :आता त्रिशा कृष्णनच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन तिला हिम्मत देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं,' तुम्ही कशातून जात आहात हे पूर्णपणे समजून शकतो...काळजी घ्या.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'लोक याची चेष्टा का करतात हे मला कळत नाही, कृपया थोडी सहानुभूती दाखवा.' आणखी एकानं लिहिलं, 'स्वत:ची काळजी घे आम्ही तुझ्याबरोबर आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर रडणारे इमोजी शेअर करत आहेत. त्रिशा तिच्या पाळीव श्वानला आपल्या मुलासारख मानत होती. अनेकदा तिनं आपल्या श्वानबरोबर फोटो शेअर करत असत.