मुंबई - Tripti Dimri Pushpa 2 Dance Number : 'ॲनिमल' फेम 'भाभी 2' या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री तृप्ती दिमरी आता अनेक चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'ॲनिमल'च्या यशानं तृप्तीचं नशीबही खुललं आहे. तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. तृप्ती साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये एंट्री करत आहे. रिपोर्ट्सवर 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात साऊथ ब्युटी सामंथा रुथ प्रभूप्रमाणे मसालेदार डान्स नंबर करताना दिसणार आहे. तृप्तीनं सामंथाची जागा घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तृप्ती दिमरी घेणार 'पुष्पा 2 द रुल'मध्ये एंट्री :तृप्ती दिमरी 'पुष्पा 2 द रुल'च्या आयटम नंबरमध्ये अल्लू अर्जुनबरोबर तिची जादू दाखवणार आहे. 'पुष्पा द राइज'मधील 'ऊ अंतवा' हे गाणं खूप हिट झालं होतं, या गाण्याचा प्रचंड क्रेझ होता.'ऊ अंतवा' गाण्यात सामंथानं धमाकेदार डान्स केला होता. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाबद्दल दररोज काहीना काही अपडेट येत आहेत. दरम्यान यावेळी अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'मधून बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे, कारण या चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' गाणं देखील हिट झालं आहे. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील दुसर गाणं 'सुसेकी' हे 29 मे रोजी रिलीज होईल. आज 23 मे रोजी 'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी याबद्दल अपडेट दिली आहे.