महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'हिरो बाप' जॅकी श्रॉफला टायगर आणि कृष्णाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - जॅकी श्रॉफ वाढदिवस

Jackie Shroff birthday : अभिनेता जॅकी श्रॉफला मुलगा टायगरने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एका मासिकाचे मुखपृष्ठ शेअर करत वडिलांसाठी त्यानं सुंदर शीर्षकही दिलंय.

Jackie Shroff birthday
जॅकी श्रॉफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 3:18 PM IST

मुंबई - Jackie Shroff birthday : अभिनेता जॅकी श्रॉफ आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याला सोशल मीडियावर अनेक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्याचा मुलगा टायगरनेही प्रेमळ सदिच्छा दिल्या आहेत. गुरुवारी, टायगरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जुन्या मासिकाचे मुखपृष्ठ पोस्ट केले आहे.

जॅकी श्रॉफला मुलगी कृष्णाने दिलेल्या शुभेच्छा

मुखपृष्ठावरील फोटोत जॅकी त्याचा मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णा श्रॉफला प्रेमाने जवळ घेतल्याचं दिसत आहे. याला शीर्षक देताना त्यानं लिहिलंय, "सर्वोत्कृष्ट माणूस आणि सर्वोत्तम वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

जॅकी श्रॉफला मुलगी कृष्णाने दिलेल्या शुभेच्छा

सुभाष घई यांच्या 'हिरो' या रोमँटिक चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ घरोघरी लोकप्रिय झाला. जॅकीला मोठ्या पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली होती. मिनाक्षी शेषाद्रीसोबतची त्याची ऑनस्क्रिन केमेस्ट्री दीर्घकाळ स्मरणात राहणारी होती. या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली. यामधील त्याच्या बासरीच्या सूरांनी लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, शम्मी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यानंतर 'तेरी मेहेरबानिया', 'कर्मा' 'राम लखन' आणि 'परिंदा' यांसारख्या यशस्वी चित्रपटांमुळे त्याने स्वतःची ओळख निर्माण केली यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

'त्रिदेव', 'बाप नंबरी बेटा दस नंबरी,' 'सौदागर,' 'खलनायक,' 'रंगीला,' 'बॉर्डर,' 'बंधन' हे त्यांचे इतर गंभीर आणि व्यावसायिक चित्रपट यशस्वी ठरले होते. जॅकी अलिकडेच कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'मस्त में रहने का' मध्ये नीना गुप्तासोबत दिसला होता. हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी प्राइम व्हिडिओवर स्ट्रिमिंग झाला.

दुसरीकडे टायगर श्रॉफ आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या थ्रिलर चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन एक वेधक खलनायकी भूमिकेत दिसणार आहे, तसेच सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. कार्तिक आर्यनचे वर्षभरानंतर तोंडगोड, 'चंदू चॅम्पियन'च्या पॅकअपनंतर केला खुलासा
  2. "करण जोहर वाईट हेअरस्टाइल करतो" : मुलगा यशने दिली ब्रेकिंग न्यूज
  3. संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details