मुंबई - दक्षिण भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बॅनर म्हणून होम्बाळे फिल्म्स नावारुपाला आली आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तर कमाईचे उच्चांक गाठलेत परंतु ओटीटीवरही हे चित्रपट अव्वल स्थावर आहेत. 'सालार: - सीझफायर भाग 1' या चित्रपटाला म्हणून मोठ्या यशाचा आनंद मिळत आहे, 300 दिवसांपेक्षा जास्त काळ हा सिनेमा ट्रेंड करत आहे. तर 'बघीरा'नं हॉटस्टारवर नंबर 1 स्थान मिळविलं आहे!. 'बघीरा' हा बहुप्रतिक्षित चित्रपटाचं दिग्दर्शन डी.आर. सूरी यांनी केलंय. शक्तिशाली VFX, मनोरंजक कथा आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीतासह, चित्रपट अॅक्शन-पॅक मनोरंजनाची खात्री देणारा आहे.
'बघीरा' या चित्रपटानं लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाला सकारात्मक रिव्ह्यू मिळाले असून उत्तम रेटिंगही प्राप्त झालंय. हा चित्रपट सध्या हॉटस्टारवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. होम्बाळे फिल्म्सच्या 'बघीरा' चित्रपटाची घोडदौड निरंतर सुरू आहे. या चित्रपटाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले असले तरी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं आपला दबदबा कायम राखला.