महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

भूषण मंजुळे स्टारर 'रीलस्टार'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू! - Bhushan Manjule - BHUSHAN MANJULE

Bhushan Manjule : नागराज मंजुळेंचा भाऊ आणि निर्माता भूषण मंजुळे यानं यापूर्वी अनेक चित्रपटातून छोट्या भूमिका केल्या आहेत. आता तो एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून त्याच्या रीलस्टारचे शूटिंग सुरू झालंय. या मराठी चित्रपटात अनेक मुख्य प्रवाहातील कलाकार काम करत आहेत.

Bhushan Manjule
भूषण मंजुळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 5:09 PM IST

मुंबई - Bhushan Manjule : नागराज मंजुळे आपल्या दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत त्यांचा भाऊ भूषण मंजुळे चित्रपटसृष्टीत मार्गक्रमण करीत आहे. भूषणने नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री', 'सैराट', 'कारखानिसांची वारी', 'घर बंदूक बिर्याणी' या मराठी चित्रपटांबरोबरच 'झुंड' या हिंदी चित्रपटात सहाय्यक कलाकार म्हणून भूमिका केल्या आहेत. आता तो प्रमुख 'हिरो'च्या भूमिकेतून मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्या चित्रपटाचे नाव 'रीलस्टार' असून नुकतेच चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू झाले आहे.


सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे आणि त्यावर अनेक रील्स बनताना दिसत असतात. या छोट्या छोट्या रील्स मुळे अनेकजण प्रसिद्धीझोतात आले आहेत. इतकेच नव्हे तर या रील्स दुनियेत स्टार सिस्टीम तयार झालेली बघायला मिळते. मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि फॉलोअर्स असणाऱ्या या रील्सस्टार्सना अनेक ठिकाणी सेलिब्रिटीज म्हणून बोलाविले जाऊ लागले आहे. त्यातील अनेकांना म्युझिक व्हिडीओज, सिरिअल्स, चित्रपटांतून भूमिका मिळू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर 'रीलस्टार' हा सिनेमा बेतलेला असून त्यातून आभासी दुनियेवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


'रीलस्टार'चे दिग्दर्शन सिमी जोसेफ आणि रॉबिन वर्गीस यांनी केले असून याची निर्मिती जे फाईव्ह एंटरटेनमेंट आणि इनिशिएटीव्ह फिल्म्स च्या बॅनरखाली करण्यात आली आहे. पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केली असून यात भूषण मंजुळे व्यतिरिक्त उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, महेंद्र पाटील, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर तसेच बालकलाकार अर्जुन गायकर व तनिष्का म्हाडसे अशी तगड्या कलाकाराची मांदियाळी आहे. 'रीलस्टार' चे सिनेमॅटोग्राफर आहेत शिनोब आणि गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांच्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे.

हेही वाचा -

  1. जान्हवी कपूरनं राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरमधील फोटो केले शेअर , पाहा फोटो - janhvi kapoor share pics
  2. जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav
  3. सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर रणदीप हुड्डानं शेअर केली पोस्ट - randeep hooda

ABOUT THE AUTHOR

...view details