मुंबई - Pushpa 2 The Rule Second Single : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'ची रिलीज डेट आता जवळ आली आहे. याआधी 'पुष्पा-पुष्पा' हे पहिलं गाणं रिलीज झालं होतं. 'पुष्पा 2'मधील हे गाणं खूप हिट झालं. या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनले. आता 'पुष्पा 2 द रुल'चं दुसरं 'सामी' गाणं रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी दुसऱ्या गाण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. आज 22 मे रोजी त्यांनी एक पोस्टर शेअर करत दुसऱ्या गाण्याच्या रिलीज डेटबाबात माहिती दिली आहे.
'पुष्पा 2'चं दुसरे गाणं :अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'चे निर्माते रिलीजपूर्वी चाहत्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत. या चित्रपटातील अल्लूचा लूक आधीच चर्चेत होता. दरम्यान 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी रश्मिका मंदान्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "पुष्पा राजनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यानं खळबळ माजवल्यानंतर आता श्रीवल्ली तिच्या प्रियकरासह मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'पुष्पा 2'चं दुसरं गाणं उद्या सकाळी 11:07 वाजता प्रदर्शित होईल." निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये रश्मिका मंदान्नाचे हात दिसत असून ती कथकची मुद्रा करताना दिसत आहे. या गाण्याला देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलंय.