महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राजकुमार-जान्हवी स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली - Mr and Mrs Mahi on OTT - MR AND MRS MAHI ON OTT

Mr and Mrs Mahi on OTT : राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची भूमिका असलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Mr and Mrs Mahi
मिस्टर अँड मिसेस माही (राजकुमार-जाह्नवी (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 7:58 PM IST

मुंबई - Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्स इंडियानं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही घोषणा करताना कॅप्शन लिहिले, 'त्यांची कथा अप्रतिम आहे, मिस्टर आणि मिसेस माही थेट तुमच्या स्क्रीनवर येणार आहेत.'

या दिवशी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे

राजकुमार आणि जान्हवी स्टारर चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' 26 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. राजकुमार-जान्हवी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं आहे. हा चित्रपट एक क्रिकेटर आणि तिचा नवरा यांच्या प्रवासाभोवती फिरतो. चित्रपटाच्या रिलीजला संमिश्र प्रतिसाद मिळाला परंतु ओटीटी पदार्पणासह, निर्मात्यांना आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मिस्टर आणि मिसेस माही पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिसेस माहीनं तिचं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण केलं

हा चित्रपट महेंद्र आणि महिमा या एका विवाहित जोडप्याची कथा आहे ज्यांना क्रिकेट खूप आवडतं. महेंद्र हा एक अयशस्वी क्रिकेटर आहे आणि जेव्हा त्याची पत्नी टेनिस बॉलवर षटकार मारताना पाहतो तेव्हा महेंद्र त्याच्या पत्नीची क्रिकेट कौशल्य ओळखतो. त्यानंतर तो तिला क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो. तिला तिच्या पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे प्रोत्साहित होऊन, डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारी मिसेस माही, शेवटी डॉक्टर म्हणून तिची कारकीर्द सोडून देते आणि तिच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात करते.

ABOUT THE AUTHOR

...view details