महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तमन्ना भाटिया महादेवाच्या भक्तीत बनली 'साध्वी', महाकुंभमध्ये लॉन्च झाला 'ओडेला २' चा टीझर - ODELLA 2 TEASER LAUNCH

तमन्ना भाटियानं २०२५ च्या महाकुंभमध्ये 'ओडेला २' चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरची एक खास झलक इथं पाहू शकता.

Odella 2
तमन्ना भाटिया (Odella 2 poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 22, 2025, 3:24 PM IST

मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटिया आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी तयार झाली आहे. तिच्या आगामी 'ओडेला २' चित्रपटाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर, चित्रपटाचा टीझर शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी महाकुंभमध्ये लाँच करण्यात आला. यावेळी तमन्नाबरोबर 'ओडेला २' चे दिग्दर्शक अशोक तेजा, निर्माते मधू, संगीतकार अजनीश लोकनाथ आणि संपत नंदी हे देखील उपस्थित होते.

'ओडेला २' चा टीझर - या टीझरची गंगा नदीच्या काठावरील शिवलिंगापासून सुरूवात होतो. यामध्ये साध्वीच्या भूमिकेत असलेल्या तमन्ना भाटियाची झलक दाखवण्यात आली आहे. ही एक गंभीर भूमिका ती या चित्रपटात साकारत आहे. तमन्नाचा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे.

हा चित्रपट एक रोमांचक सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा विश्वास निर्मात्यांना आहे. तमन्ना साकारत असलेलं चांगलं पात्र आणि इतर काही वाईट पात्रांच्यातील संघर्ष यात पाहायला मिळेल. टीझरवरून असा अंदाज लावता येतो की चित्रपटाची कथा अलौकिक शक्ती आणि भक्ती या दोन्हींवर आधारित आहे. 'ओडेला २' या चित्रपटटा अशोक तेजा दिग्दर्शन करत आहेत आणि संपत नंदी टीमवर्क्स याची निर्मिती करत आहेत.

संपत नंदी यांनी तमन्नाचे कौतुक केलं - 'ओडेला २' हा चित्रपट अशोक तेजा दिग्दर्शित आणि संपत नंदी निर्मित आहे. संपत नंदी म्हणतात की तमन्नाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. संपत नंदी यांनी एका मुलाखतीत 'ओडेला २' बद्दल सांगितले की, हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक शक्तिशाली असेल.

संपत नंदी म्हणाले की, 'तमन्ना या चित्रपटात एका साध्वीची भूमिका पहिल्यांदाच साकारत आहे. या चित्रपटाचा ती यापूर्वी कधीही भाग नव्हती, त्यामुळे ती चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होती. तयारीसाठी तिच्याकडं कमी वेळ होता, तरीही तिनं अनेक साधूंचं निरीक्षण केलं आणि त्यांची देहबोली समजून घेतली. बदल घडवून आणण्याची तिची क्षमता केवळ तिच्यातील प्रतिभेमुळं आहे. या चित्रपटासाठी तिनं ज्या पद्धतीनं स्वतःला तयार केलंय आणि त्याचा स्तर उंचावला आहे ते आश्चर्यकारक आहे. तिची आवड अजूनही तशीच आहे आणि ती खूप प्रेरणादायी आहे."

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details