मुंबई - Box office collection day 1 :अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस' 22 मार्च रोजी एकत्र प्रदर्शित झाले आहेत. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'मडगाव एक्स्प्रेस' या दोन्ही चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही चांगलीच दमदार आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा बायोपिक आहे तर 'मडगाव एक्सप्रेस' हा कॉमेडी चित्रपट आहे. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
'मडगाव एक्सप्रेस' बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'मडगाव एक्स्प्रेस'च्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करणार अशी अपेक्षा होती. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'मडगाव एक्स्प्रेस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटीची कमाई केली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरखाली बनलेला 'मडगाव एक्सप्रेस' हा चित्रपट तीन मित्रांवर आधारित आहे. दिव्येंदू शर्मा, अविनाश तिवारी आणि प्रतीक गांधी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नोरा फतेही 'मडगाव एक्सप्रेस'मध्ये आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट चांगली कामगिरी करेल असं अशी अपेक्षा केली जात आहे.