मुंबई- Sudhir Phadke biopic : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींची भूमिका सुनील बर्वे साकारत असून त्यांच्या पत्नी ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. तर ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत. या महत्वपूर्ण भूमिका समोर आल्यानंतर आता या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरील पडदा उचलण्यात आला आहे. बाबूजींचा बायोपिक असल्यामुळे अर्थातच अनेक दिग्गज व्यक्तीमत्वांचं दर्शन यात घडणार आहे. यासाठी अनेक या नामवंत व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत, हे देखील समोर आले आहे.
आदिश वैद्य (तरूण सुधीर फडके), अपूर्वा मोडक (आशा भोसले), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), मिलिंद फाटक ( राजा परांजपे), धीरज जोशी (स्वातंत्र्यवीर सावरकर), विहान शेडगे (छोटा राम), विभावरी देशपांडे (सरस्वतीबाई, सुधीर फडकेंची आई), नितीन दंडुके (पाध्ये बुवा), परितोष प्रधान (डॅा. अशोक रानडे), साहेबमामा फतेहलाल (अविनाश नारकर), डॅा हेडगेवार (शरद पोंक्षे), न. ना. देशपांडे ( उदय सबनीस), मोहम्मद रफी (निखिल राऊत), निखिल राजे शिर्के ( श्रीधर फडके) हे कलाकार या व्यक्तिरेखा साकारताना दिणार आहेत. या नामवंत कलाकारांना या व्यक्तिरेखांमध्ये पाहाणे हे प्रेक्षकांसाठी एका आनंदाची संगीतमय पर्वणीच ठरणार आहे.