महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

भारताच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यावर बायोपिकची घोषणा - Sukumar Sen biopic - SUKUMAR SEN BIOPIC

Sukumar Sen biopic : चित्रपट उद्योगात अनेक निर्माते महान व्यक्तींच्या बायोपिकवर खूप भर देत आहेत. नुकतेच रॉय कपूर फिल्म्सनं भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यावर बायोपिकची घोषणा केली आहे.

Sukumar Sen biopic
सुकुमार सेन यांच्यावर बायोपिकची घोषणा ((ANI Photo))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 4:56 PM IST

मुंबई - Sukumar Sen biopic : भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार 3 जून रोजी रॉय कपूर फिल्म्सन या प्रॉडक्शन बॅनरनं त्रिचीटेनमेंट मीडियाच्या सहकार्याने सांगितलं की त्यांनी सुकुमार सेन यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना हिरंवा कंदील मिळाला आहे.

18 व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी मंगळवारी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. व्हरायटीनुसार, हा चित्रपट 1951-52 मधील भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांचे शिल्पकार सेन यांच्या जीवनावर आधारित असेल. एक गणितज्ञ आणि सिव्हील सर्वीसमध्ये उच्च पादावर असलेल्या सेन यांनी भारताला ब्रिटीश वसाहतीतून देशाला लोकशाही प्रजासत्ताकमध्ये बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सुकुमार सेन यांच्याकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर, त्यांनी 565 संस्थान आणि नव्याने स्थापन झालेल्या राज्यांमध्ये पसरलेल्या 175 दशलक्ष लोकांचा मतदारसंघ सांभाळला.

सुकुमार सेन यांच्या चरित्रपटाची कथा पडद्यावर आणताना, सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले, 'आमच्या राष्ट्रीय नायकांपैकी एक, भारताच्या लोकशाही इतिहासाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुकुमार सेन यांची कथा जिवंत करताना आम्हाला खूप सन्मान वाटतो. निरक्षरतेचा सामना करण्यासाठी राजकीय पक्षांना वेगवेगळ्या चिन्हे आणि रंगांनी ओळखण्याच्या यंत्रणेपासून ते मतदारांची तोतयागिरी टाळण्यासाठी नखांवर न मिटणारी शाई लावण्याच्या कल्पनेपर्यंत त्यांनी अंमलात आणलेल्या अनेक नवकल्पना आजही लागू आहेत.

सिद्धार्थ रॉय कपूर पुढे म्हणाले, 'आपल्या लोकशाही प्रक्रियेची वास्तू निर्माण करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव झाला पाहिजे. आम्ही भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांना आमच्या पहिल्या निवडणुकीची ही रोमांचक कथा आणि त्यामागील आश्चर्यकारक व्यक्ती दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.'

हेही वाचा -

  1. किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If
  2. लवकरच वडील होणार वरुण धवन, वांद्रा येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या बाहेर झाला स्पॉट - Varun Dhawan
  3. नताशा-हार्दिकचा घटस्फोट झाला नाही, हार्दिक पांड्याच्या पत्नीनं विभक्त होण्याच्या अफवांवर ट्रोल्सला दिलं उत्तर - Natasha Hardik Not Divorced

ABOUT THE AUTHOR

...view details