महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'स्त्री 2' ओटीटीवर झळकणार : कधी आणि कुठे याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली... - Stree 2 OTT Release - STREE 2 OTT RELEASE

Stree 2 OTT Release: 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. आता या चित्रपटाचे चाहते ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट या वर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि केवळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही तर बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

Instagram Stree 2 poster
स्त्री 2 पोस्टर (Photo - Instagram Stree 2 poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 12:42 PM IST

मुंबई - श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची भूमिका असलेला 'स्त्री 2' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. हा चित्रपट जवळपास 42 दिवसांपासून थिएटरमध्ये चालू आहे आणि भारतात आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 580 कोटी रुपये कमाई केली आहे. आपल्या नेत्रदीपक कमागिरीसह 'स्त्री 2' ने जवळपास सर्वांचीच मने जिंकली आहेत. आता, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

यापूर्वी 'स्त्री' या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले होते. हा चित्रपट सध्या डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर प्रवाहित आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार 'स्त्री'च्या सीक्वेलचे अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीमिंग होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप 'स्त्री 2' ची ओटीटी रिलीजची तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी, 27 सप्टेंबरपासून हा चित्रपट प्रवाहित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, हा चित्रपट सुरुवातीचे काही दिवस भाडे तत्त्वावर दिसणार आहे.

'स्त्री 2' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे, कारण चित्रपटगृहांमध्ये तो अजूनही चांगला परफॉर्म करत आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये ओटीटीवर दिसेल अशी अपेक्षा आहे. याची घोषणा येत्या 27 सप्टेंबर रोजी होईल, असं सांगितलं जात आहे.

'स्त्री 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्श्न :

15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटाला आता थिएटरमध्ये 43 दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या 42 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज समोर आला आहे. सहाव्या बुधवारी चित्रपटाने अंदाजे 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाने 42 दिवसांत अंदाजे 581.40 कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा -

  1. जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या, 'स्त्री 2' ते 'कल्की 2898 एडी'पर्यंतच्या चित्रपटांचं कलेक्शन - World bollywood day
  2. 'स्त्री 2'नं रचला भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास, श्रद्धा कपूर स्टारर चित्रपटानं गाठला मोठा टप्पा... - STREE 2
  3. 'स्त्री 2' तला 'सरकटा' फेम सुनील कुमार अली फजलबरोबर करतोय शूट, फोटो व्हायरल - sunil kumar

ABOUT THE AUTHOR

...view details