महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2'नं रोवले यशाचे झेंडे, पाहा कमाईचा आकडा - STREE 2 movie - STREE 2 MOVIE

Stree 2 Box Office Collection Day 4: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं रिलीजच्या पहिल्या वीकेंडला जोरदार कमाई केली आहे. आज रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे रुपेरी पडद्यावर हा चित्रपट मोठी कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Stree 2 Box Office Collection Day 4
'स्त्री 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4 (स्त्री 2 पोस्टर (Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 12:24 PM IST

मुंबई - Stree 2 Box Office Collection Day 4 :अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2' चित्रपटानं पहिल्या 4 दिवसात 200 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप वेगानं कमाई करत आहे. 'स्त्री 2' हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये, म्हणजेच रविवारी 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'जवान', 'अ‍ॅनिमल' आणि 'पठाण'नंतर पहिल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. रविवारी 'स्त्री 2'नं धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 400 कोटीचा टप्पा गाठेल असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

'स्त्री 2' चित्रपटाचं एकूण कलेक्शन :अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, या चित्रपटानं रविवारी 58.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या चित्रपटानं 4 दिवसांत एकूण देशांतर्गत 204 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक निशित शॉ यांच्या मते, 'स्त्री 2' हा पहिल्या रविवारी जवान (रु. 71.63 कोटी), 'अ‍ॅनिमल' (63.46 कोटी) आणि 'पठाण' (58.50 कोटी) नंतर चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटानं जगभरात 283 कोटीची कमाई केली आहे.

'स्त्री 2'चं राज्य बॉक्स ऑफिसवर :चौथ्या दिवसाच्या कलेक्शनसह, 'स्त्री 2' हा वर्षातील दुसरा सर्वात मोठा कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. दरम्यान आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं सोमवारी 'स्त्री 2' हा बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणार, असल्याचं दिसत आहे. 5 दिवसांच्या वीकेंडमध्ये 'स्त्री 2'नं 225 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला तर, हा चित्रपट 'फायटर'ला कमाईत (रु. 212.75 कोटी) मागे टाकेल आणि 2024 मधील नंबर 1 कमाई करणारा बॉलिवूडपट ठरेल. 'स्त्री 2'ला प्रेक्षकांकडून असेच प्रेम मिळत राहिल्यास, 'कल्की 2898 एडी'ला देखील हा चित्रपट मागे टाकू शकतो. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला असून चित्रपटगृहांमध्ये आता गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

  1. 'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीला श्रद्धा कपूर, राजकुमार रावसह इतर सेलिब्रिटींनी लावली हजेरी - STREE 2
  2. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा केला पार - Stree 2 Box Office Collection Day 2
  3. 'स्त्री 2'नं पेड प्रिव्ह्यूमध्ये केली मोठी कमाई, पहिल्या दिवशी 'गदर 2'चा रेकॉर्ड मोडेल? - Stree 2

ABOUT THE AUTHOR

...view details