मुंबई -Aryan and Suhana Khan:अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना खान रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दोन्ही स्टार किड्सनं त्यांच्या स्टायलिश लूकनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात ब्राझिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सी आणि अमिताभ बच्चन यांचा नातू-अभिनेता अगस्त्य नंदा हा देखील उपस्थित होता. आर्यन खान-लॅरिसा बोन्सी आणि सुहाना-अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. या कार्यक्रमाला पोहोचलेल्या पापाराझींनी स्टार किड्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आर्यन आणि सुहानाचा स्टायलिश अंदाज :आर्यन आणि सुहाना स्टायलिश लूकमध्ये खूप आकर्षक दिसत होते. कॅज्युअल ब्लॅक प्रिंटेड टी-शर्ट, जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये आर्यन हा देखणा दिसत होता. तर, सुहानानं बॉडी-हगिंग मॅक्सी आउटफिट परिधान केली होती. आर्यनला डेट करत असल्याची चर्चा असलेली ब्राझिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सीनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला , तर सुहानाचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदानं पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. 'द आर्चीज'मध्ये एकत्र दिल्यानंतर सुहाना आणि अगस्त्यचं नातं खूप चर्चेत आलं होतं. आर्यनबद्दल अधिक सांगायचं झालं तर, त्याची कथित गर्लफ्रेंड तो ज्या कार्यक्रमात जातो तिथे ती हजर राहते.