मुंबई -बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या पाठदुखीनं त्रस्त आहे. एका कॉन्सर्टदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. सोनूनं स्वतः ही माहिती त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यानं लिहिलं की, 'काही लोकांनी भाकीत केलं होतं की, हे वर्ष अपघात आणि वैद्यकीय समस्यांनी भरलेलं असेल. आता असच दिसत आहे, त्यांचं भाकित खर ठरलंय. मला असा स्थितीत देखील पुण्यातील स्टेजवर जावं लागलं. लोकांना ते खूप सोपे वाटतं पण शोबिजचे जग अडचणींनी भरलेलं आहे. आज माता सरस्वती मला आधार दे.'
सोनू निगम मसाज घेताना दिसला : व्हायरल झालेल्या व्हिडिओत सोनू निगम जिममध्ये वेळ घालवताना दिसत आहे. यासोबतच तो मसाजही घेत आहे. मसाजनंतर सोनूनं पुण्यात आपला संगीत कार्यक्रमही सादर केला. कॉन्सर्टमध्ये सोनू निगम हा छान दिसत होता. दरम्यान सोनूनं आतापर्यंत 800हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. पद्मश्रीनं सन्मानित झालेला सोनू निगम आजही संगीताच्या जगात खूप सक्रिय आहेत. त्याची अनेक गाणी ही लोकप्रिय झाली आहेत. सोनू निगम अनेकदा संगीत रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसतो.