मुंबई - Sonakshi Sinha wedding :सोनाक्षी सिन्हा लवकरच झहीर इक्बाबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. याआधी सोनाक्षीनं नुकतीच झहीरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून झहीरनेही हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पुन्हा पोस्ट केली आहेत. खरंतर, झहीरची बहीण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रतनसीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. फोटोत अभिनेत्री सोनाक्षी तिचे होणारे सासरे, सासू आणि नणंदबरोबर बॉन्डिंग करताना दिसली. तर दुसरीकडे तिचा प्रियकर झहीर तिची आई आणि बहिणीच्यामध्ये उभा असल्याचा दिसला.
झहीरच्या बहिणीने शेअर केलेला फोटो
सनम एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे, तिनं अलीकडेच सोनाक्षी सिन्हासह अनेक 'हीरामंडी' स्टार्सची स्टाइल केली आहे. तिनं हार्ट इमोजीसह फॅमिली फोटो शेअर केला आहे. हा फोटो झहीरनेही त्याच्या इंस्टाग्रामवर पुन्हा पोस्ट केला आहे. झहीरचे वडील इक्बाल हे बिझनेसमन आहेत, हे कुटुंब सलमान खानच्या जवळचे आहे. त्याच्या बहिणीशिवाय झहीरला एक लहान भाऊ आहे जो कंप्युटर इंजिनिअर म्हणून काम करतो.
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या रिसेप्शनचा ड्रेस कोड
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका एखाद्या मासिकाच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये दोघेही सुट्टीत एन्जॉय करत असतानाचा एक सुंदर फोटो आहे. त्यांचा विवाह सोहळा 23 जून रोजी रात्री 8 वाजता मुंबईतील बस्तियान येथे होणार आहे. या लग्नासाठी ड्रेस कोड कॅज्युअल असणार आहे आणि जोडप्यानं विशेषत: पाहुण्यांना लाल रंग परिधान करू नये असं, सांगण्यात आलं आहे.