महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'तेरे मस्त मस्त दो नैन'वर थिरकले नवविवाहित सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल - Sonakshi Sinha wedding reception - SONAKSHI SINHA WEDDING RECEPTION

Sonakshi Sinha wedding reception : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे नवविवाहित जोडपं 'तेरे मस्त मस्त' या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दिसलं. त्यांचा हा सुंदर व्हिडिओ सोनाक्षीची हेअरस्टायलिस्ट सीमा हिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (hairstories_byseema Instagram / ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 11:31 AM IST

मुंबई - Sonakshi Sinha wedding reception : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची रात्र संस्मरणीय ठरली. नवविवाहित जोडप्यानं सोनाक्षीच्या डेब्यू चित्रपट 'दबंग' मधील 'तेरे मस्त मस्त' या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करुन उपस्थितांना प्रभावीत केलं. या रिसेप्शनमधील जादुई क्षण कॅप्चर करणाऱ्या स्नॅपशॉट्स आणि व्हिडिओंचा सोशल मीडियावर पूर आला आहे. या सादरीकरणातून या जोडप्यांची छान केमेस्ट्री दिसून आली.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (hairstories_byseema Instagram / ANI)

सोनाक्षीच्या हेअरस्टायलिस्टनं एक खास क्षण शेअर केला ज्यामध्ये झहीरनं, पांढरी शुभ्र शेरवानी परिधान करून, लाल सुशोभित गाऊनमध्ये शोभून दिसणारी वधू सोनाक्षीला सेरेनेड करण्यासाठी मंचावर पोहोचला होता. दोघांनी 'तेरे मस्त मस्त' या गाण्यावर ताल धरताच उपस्थितांनी त्यांना चिअर्स केलं. त्यानंतर दोघांनी त्यांच्या एकत्र प्रवासाचे प्रतीक असलेल्या डिझाईन्सने सुशोभित केलेला लग्नाचा केक कापला. त्यानंतर सर्वांनी जल्लोष करुन नवविवाहितांना प्रोत्सहित केलं.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सलमान खान, सिद्धार्थ रॉय कपूरसह विद्या बालन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांच्यासह बॉलीवूडच्या तारकांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचे अनेक दिग्गज या जोडप्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मिलन साजरं करण्यासाठी आले होते.

सात वर्षांपासून एकत्र असलेल्या सोनाक्षी आणि झहीरनं जवळचे कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलं.या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या लग्नाची झलक सोशल मीडियावर शेअर केली असून, 23 जून हा दिवस त्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सोनाक्षी आणि झहीरनं रविवारी त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला. इंस्टाग्रामवर या जोडप्यानं त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा -

  1. सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बालच्या रिसेप्शनला अवतरलं तारांगण, सलमान खानची दिमाखदार एन्ट्री - SONAKSHI ZAHEER WEDDING
  2. विवाहबंधनात अडकल्यानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची पहिली झलक आली समोर - Sonakshi And Zaheer Reception
  3. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल विवाहबद्ध, बेस्टीयनमध्ये स्वागत समारंभाचं आयोजन; पाहा फोटो - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding

ABOUT THE AUTHOR

...view details