महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिलजीत दोसांझनं मुंबई कॉन्सर्टपूर्वी त्याच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीवर दिली प्रतिक्रिया - SINGER DILJIT DOSANJH

दिलजीत दोसांझनं मुंबईत कॉन्सर्ट सुरू करण्यापूर्वी 'पुष्पाराज'च्या स्टाईलमध्ये ॲडव्हायझरी जारी करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Diljit Dosanjh
दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh - ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 12 hours ago

मुंबई - पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा दिल लुमिनाटी टूर 19 डिसेंबर रोजी मुंबईला पोहोचला. यावेळी त्यानं चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केलं. आता कॉन्सर्टमधून दिलजीतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या कॉन्सर्टसाठी जारी केलेल्या ॲडव्हायझरीबद्दल बोलताना दिसत आहे. शोदरम्यान त्यानं 'पुष्पाराज'च्या अंदाजात एक जबरदस्त संदेश त्याच्या चाहत्यांना दिला. इंस्टाग्रामवरील एका फॅन पेजनं मुंबई कॉन्सर्टमधील दिलजीतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, 'काल मी माझ्या टीमला विचारले की, माझ्यावर काही ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे का? यानंतर त्यांनी म्हटलं सर्व ठीक आहे. आज सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला कळलं की माझ्या विरोधात ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. काळजी करू नका, सर्व ॲडव्हायझरी माझ्यावर आहे, तुम्ही इथे मजा करण्यासाठी आला आहेत, मी तुम्हाला दुप्पट मजा करून देईन.'

दिलजीत दोसांझचा व्हिडिओ व्हायरल : यानंतर पुढं म्हटलं, 'आज सकाळी जेव्हा मी योगा करत होतो, तेव्हा माझ्या मनात एक चांगला विचार आला. मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यापासून करेल. समुद्रमंथन झाल्यानंतर देवांनी अमृत पिले होते, मात्र महादेवानं विष प्राशन केले होते. महादेवांनी ते विष स्वत:च्या आत घेतले नाही, ते घशापर्यंत ठेवले. त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हणतात. मला तर हेच शिकायला मिळाले की, आयुष्यामध्ये कोणी तुमच्यावर किती विष फेकत असेल तर, ते आपल्या आतमध्ये जाऊ देऊ नका. मी तर हेच शिकलो आहे. तुम्ही तुमच्या कामात कधी कमी येऊ देऊ नका. लोक तुम्हाला रोकणार ,टोकणार आणि ते आपला खूप जोर लावेल. स्वत:ला कधीच आतमधून डिस्टर्ब होऊ देऊ नका. मस्त मजा करा, आज मी पण झुकणार नाही.'

कुठे होणार पुढचा कॉन्सर्ट : दिलजीत दोसांझचा दिल लुमिनाटी टूर हा वेगवेगळ्या शहरांमध्ये होत आहे. यापूर्वी त्याचा शो इंदूरला झाला होता. या शोमध्ये देखील अनेक चाहते आले होते. हा त्याचा शो खूप चर्चेत होता. आता त्याचा पुढचा शो गुवाहाटीमध्ये होणार आहे. दिल लुमिनाटी टूरदरम्यान दिलजीत दोसांझ हा काश्मीरला सुट्टी एंजॉय करायला गेला होता. त्यानं याठिकाणचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा :

  1. 'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल, वरुण धवनसह दिलजीत दोसांझ, काश्मीरमध्ये सुरू होणार शूटिंग
  2. दिलजीत दोसांझचा काश्मीरमधील सुट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  3. इंदूर कॉन्सर्टदरम्यान ब्लॅक तिकिटांवर दिलजीत दोसांझनं दिली 'ही' प्रतिक्रिया...

ABOUT THE AUTHOR

...view details