मुंबई Stree 2 : अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अलीकडील रिलीज झालेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानं 12 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'स्त्री 2' चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन 600 कोटी झालं आहे. दरम्यान, श्रद्धानं आता घर भाड्यानं घेतल्याची बातमी समोर आली आहे. तिनं सुपरस्टार हृतिक रोशनचं घर भाड्यानं घेतलं आहे. आता ती अक्षय कुमारची शेजारी बनणार आहे. याच ठिकाणी अक्षय कुमार त्याच्या पत्नीबरोबर इमारतीतील एका आलिशान डुप्लेक्समध्ये राहतो.
श्रद्धा कपूरनं घेतलं भांड्यानं घर :याआधी वरुण धवन हे घर खरेदी करणार होता. वरुण हा पत्नी आणि मुलासह आधीपासून इथे राहत होता. मात्र काही कारणामुळे याबाबतचे करार-मदार व्यवहार होऊ शकले नाहीत. नुकतंच श्रद्धानं झाकीर खानच्या शोमध्ये सांगितलं होतं की, ती तिच्या आई-वडिलांबरोबर घरी राहते आणि तिला कुटुंबाबरोबर राहायला आवडते. या शोमध्ये झाकीरनं म्हटलं होत की, "श्रद्धा, तू खूप भाग्यवान आहेस की, तुला आई- वडिलांच्या सावलीत राहायला मिळत आहे. जेव्हापर्यत तुला आई-वडीलांबरोबर राहायचं आहे, तू राहा." यानंतर श्रद्धा उत्तर देते, "हाच माझा प्लॉन आहे."