मुंबई - Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच 'स्त्री 2'च्या प्रमोशनसाठी लखनऊला गेली होती. ती परतत असताना चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती. यावेळी श्रद्धानं आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. तिनं चाहत्यांची खूप खास पद्धतीनं भेट घेतली. आता तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तिचा व्हिडिओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये श्रद्धा तिच्या चाहत्यांना भेटली आणि त्यांना मिठीही मारली. यानंतर उत्साही चाहत्यांना मिठी मारून यावेळी आनंद देखील व्यक्त केला.
श्रद्धा कपूरचा व्हिडिओ झाला व्हायरल : इन्स्टाग्रामवर एका चाहत्यानं शेअर केलेली क्लिप ही सर्वांना पसंत पडली आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका चाहत्यांन लिहिलं, "श्रध्दा तुझ्यासारख कोणीचं नाही, तू बेस्ट आहेस. दुसऱ्या चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, " मी पण त्यावेळी पाहिजे होती, श्रध्दानं मला देखील मिठी मारली असती." आणखी एका चाहत्यानं यावर लिहिलं, 'ओ स्त्री कल आना' लखनऊच्या मुलांना उचलून घेऊन जा." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. सध्या श्रद्धा 'स्त्री 2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे, त्यामुळे ती अनेक ठिकाणी जात आहे.