मुंबई - Shraddha Kapoor :हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडिया खूप सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. श्रद्धा कपूर नुकतीच 18 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईमधील एका कार्यक्रमात पोहोचली होती, तेव्हा तिला खूप भूक लागली होती. यावेळी पापाराझीचं स्टॉल बाहेर पिझ्झा वाटत होते. तिला प्रचंड भूक लागली असल्यानं तिनं पटकन जाऊन विचारले की 'काही अतिरिक्त आहे का, जर असेल तर मला एक नक्की द्या.'' यानंतर तिला एक व्यक्ती पिझ्झा देतो. यावर ती, धन्यवाद म्हणते आणि तिथून निघून जाते.
श्रद्धा कपूर मागितला फ्री पिझ्झा : यानंतर तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात ती म्हणते ,''मला खूप भूक लागली होती. तुम्ही माझ्याबरोबर पिझ्झा शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडून देखील एक ट्रीट बाकी आहे.'' हा पिझ्झा स्टॉल पापाराझीनं लावला होता. आता तिचे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकजण श्रद्धा कपूरला क्यूट असल्याचं म्हणत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यांनं लिहिलं, ''श्रद्धा तुला कुठला खाद्यपदार्थ जास्त खायला आवडतो.'' दुसऱ्यानं लिहिलं, ''मला श्रद्धा खूप आवडते आणि पिझ्झा पण.'' आणखी एकानं लिहिलं, ''फ्रि पिझ्झा आज तर पार्टी.'' अशा अनेक कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर श्रद्धाचे जेवण करत असताना आणि धमाल करतानाचे खूप व्हिडिओ खूप आहेत. श्रद्धाला चविष्ट जेवण करायला खूप आवडते.