मुंबई - Stree 2: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' रिलीजच्या जवळ आहे. 'स्त्री 2'च्या प्रस्तावित रिलीजला फक्त एक आठवडा उरला आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक अपडेट आली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. आता 'स्त्री 2' चित्रपट एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी नाईटला प्रदर्शित होणार आहे. 15 ऑगस्टला जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा ॲक्शन ड्रामा चित्रपट 'वेदा' आणि अक्षय कुमार, फरदीन खान, एमी वर्क, आदित्य सील, तापसी पन्नू, प्रज्ञा जैस्वाल, वाणी कपूर स्टारर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'खेल खेल में' रुपेरी पडद्यावर रिलीज होईल.
'स्त्री 2' रिलीजची तारीख बदलली? :'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी हे मोठं पाऊल उचललं आहे. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान आणि जिओ स्टुडिओनं चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्याबरोबर 14 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2' चित्रपटाचा नाईट शो आयोजित करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी, 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी त्यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'साठी देखील असंच केलं होतं. आता 'स्त्री 2' चित्रपटाचे मध्यरात्रीचे शोज ठेवले जातील. 'स्त्री 2'चे नाईट शोज 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. 14 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2'चा नाईट शो फक्त फॅन इव्हेंटद्वारे चालवण्याची तयारी सुरू आहे.