मुंबई - Sunil Dutt birth anniversary : ज्येष्ठ दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांच्या आज जन्मदिन. 6 जून 1929 मध्ये पाकिस्तानातील वेस्ट पंजाब प्रांतात जन्मलेलेल सुनिल दत्त यांचा परिवार नंतर हरियाणामध्ये राहायला आला. सुनिल दत्त यांनी अभिनेता ते लोकप्रिय लोकनेता अशी मोठी कारकिर्द त्यांनी गाजवली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची मुलं असलेल्या संजय दत्त आणि प्रिया दत्तनं आज वडिलांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे. आज 6 जून रोजी वडिलांच्या 95 व्या जयंतीनिमित्त बॉलिवूडच्या 'मुन्ना भाई'नं त्यांच्या स्मरणार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.
गुरुवारी, संजय दत्तनं त्याच्या वडिलांचा मोनोक्रोम फोटो पोस्ट केला आणि त्यांचे जयंतीनिमित्त स्मरण केलं. त्याने भावनिक चिठ्ठीसह कॅप्शनमध्ये लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, मला तुमची आठवण येते तुम्ही मला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टींचं मी पालन करेन. मुल्यं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजूंना मदत करणारी एक नम्र आणि चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्नशील राहिन."
पहिला फोटो संजयच्या बालपणीचा आहे, ज्यामध्ये तो त्याची बहीण प्रिया दत्त आणि वडील सुनील दत्तबरोबर दिसत आहे. एका प्रेमळ पित्याप्रमाणे सुनील दत्तनं आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेतलं आहे. दुसऱ्या फोटोत संजय प्रियाच्या बरोबर खेळताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सुनिल दत्त यांचे आनंद क्षण चित्रीत झाले आहेत.
प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता दिसली- प्रिया दत्त
संजय दत्तची बहीण प्रिया दत्त हिनेही वडिलांची आठवण काढली आहे. आपल्या वडिलांची आठवण करताना तिनं लिहिले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा, आज आम्ही तुमचे आयुष्य साजरं करत आहोत, तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या अटींवर जगले. तुम्ही संकटांच्या वर मात करताना दिसलात आणि प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता दिसली आणि प्रत्येकाला दुसरी संधी मिळाली पाहिजे यावर तुमचा विश्वास होता.