महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN - SALMAN KHAN

Salman khan and Sikandar shoot : सलमान खान अभिनीत 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून काही फोटो व्हायरल झाले आहेत. 'सिकंदर' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Salman khan and Sikandar shoot
सलमान खान आणि सिकंदर शूट (सलमान खान (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 11:03 AM IST

मुंबई - Salman khan and Sikandar shoot :बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 18 जूनपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. 'गजनी' दिग्दर्शक ए आर मुरुगोदास हे 'सिकंदर'चं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान ॲक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. सलमान खानला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सलमान खानच्या करिअरसाठी संजीवजी म्हणून काम करेल असं अनेकांना वाटत आहे. दरम्यान, 'सिकंदर'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेटवरीलच्या या फोटोमध्ये निर्माता साजिद नाडियादवाला कॅमेऱ्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.

सलमान खान आणि सिकंदर शूट ((IAMGE- SAJID NADIADWALA INSTAGRAM))

'सिकंदर'च्या सेटवरील फोटो झाले व्हायरल :अद्याप सेटवरून सलमान खानची झलक दिसली नाही. येणाऱ्या काळात 'सिकंदर'च्या सेटवरून सलमानची झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 'सिकंदर'च्या सेटवरील फोटो प्रॉडक्शन हाऊस नाडियादवाला ग्रँडसनच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले गेले आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना, प्रतिक पाटील बब्बर मुख्य भूमिकेत असून चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. सलमान खानचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सलमानच्या चाहत्यांना 'सिकंदर'च्या रिलीजसाठी बरीच वाट पाहावी लागणार आहे.

सलमान खान आणि सिकंदर शूट ((IAMGE- SAJID NADIADWALA INSTAGRAM))

'सिकंदर' चित्रपट कधी होईल रिलीज :'सिकंदर' हा चित्रपट सलमान खानच्या चाहत्यांसाठी ईदची भेट आहे. हा चित्रपट 2025मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा सर्वात अनोखा लूक 'सिकंदर'मध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटी तो 'टायगर 3' या चित्रपटामध्ये कतरिना कैफबरोबर दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. आता 'सिकंदर' हा चित्रपट प्रेक्षकांवर किती जादू चालवणार हे येत्या काळात समजेल. या चित्रपटासाठी दिग्दर्शक ए आर मुरुगोदास यांनी खूप मेहनत घेतली आहे. दरम्यान, सलमान खानच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'दबंग 4' , 'टायगर वर्सेस पठान', 'किक 2', 'इन्शाअल्लाह', 'नो एंट्री 2' आणि 'पवन पुत्र भाईजान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. राहुल मोदीनं चोरलं श्रद्धा कपूरचं हृदय? शक्ती कपूरच्या मुलीची 'उडलीय' झोप!! - Shraddha Kapoor
  2. 'चंदू चॅम्पियन'नं कपिल देवला केलं भावूक, म्हणाले 'चित्रपट चुकवू नका' - Kartik Aaryans Chandu Champion
  3. 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी,आक्षेपार्ह संवाद हटवण्याचे निर्देश - Hamare Baarah Movie

ABOUT THE AUTHOR

...view details