मुंबई - Ibrahim Ali Khan and Palak Tiwar : अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री पलक तिवारी यांच्या अफेअरची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. दोघेही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होतात. दरम्यान इब्राहिम आणि पलक पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इब्राहिम पलकचा हात पकडून तिला कारमध्ये बसताना दिसत आहे. दोन्ही स्टार किड्स एकमेकांना डेट करत असल्याचं चाहत्यांचे म्हणणं आहे. इब्राहिम आणि पलकचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.
इब्राहिम आणि पलकचा व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर अनेकजण इब्राहिमचं कौतुक करताना दिसत आहे. त्याला आता त्याच्या चाहत्यानी केरिंग बॉयफ्रेंडचा टॅग दिला आहे. आता या व्हिडिओत दोघांच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारीनं ब्लॅक टँक टॉप आणि ब्लॅक डेनिम परिधान केला आहे. याशिवाय इब्राहिमनं काळ्या रंगाच्या टी-शर्टवर निळ्या रंगाचा जीन्स घातला आहे. हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सैफचा मुलगा आपल्या कथित गर्लफ्रेंडला गर्दीपासून वाचवताना दिसत आहे. इब्राहिम आणि पलक कुठूनतरी येत असताना पापाराझींनी त्यांना घेरलं होतं. पलक आणि इब्राहिमनं आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केला नाही. दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्र मानतात असे ते अनेकदा म्हणतात.