महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rohit Shetty Birthday : रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल - Rohit Shetty Birthday

Rohit Shetty Birthday : आज रोहित शेट्टीनं आपलं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. कॉप युनिव्हर्स दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ॲक्शन-ड्रामा चित्रपटांची यादी आम्ही आज या विशेष दिवशी तुमच्यासाठी तयार केली आहे.

Rohit Shetty Birthday
रोहित शेट्टीचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 2:39 PM IST

मुंबई- Rohit Shetty Birthday : ॲक्शन चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आज 14 मार्च रोजी 50वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शेट्टीची गणना आज बॉलिवूडमधील बड्या फिल्ममेकर्समध्ये केली जाते. 'गोलमाल', 'सिंघम', 'चेन्नई एक्सप्रेस' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे रोहित शेट्टीचे वडील एमबी शेट्टी हे ॲक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेता होते. रोहित शेट्टीची आई मधू शेट्टी यांनीही ज्युनियर आर्टिस्ट आणि स्टंट वुमन म्हणून फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. रोहितच्या वडिलांचे कमी वयातच निधन झालं, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या रोहितवर आल्या. रोहित शेट्टीनं 2003 मध्ये पहिला चित्रपट 'जमीन' दिग्दर्शित केला होता, पण तो फारसा हिट ठरला नाही. यानंतर त्यानं कॉमेडी झोनमध्ये जाऊन 'गोलमाल' (2006) हा चित्रपट केला 'गोलमाल' हा चित्रपट हिट ठरला. रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याच्या आगामी ॲक्शन-कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

  • गोलमाल 5 : रोहित शेट्टी हा ॲक्शन तसेच कॉमेडी जॉनर चित्रपटांचा मास्टरमाइंड आहे. त्याची गोलमाल फ्रँचायझी सुपरहिट आहे आणि आता 19 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणाऱ्या 'गोलमाल 5'ची शुटिंग तो सुरू करणार आहे.
  • सिम्बा 2 : रोहित शेट्टीनं सर्वात आधी अजय देवगणचा हात धरला आणि त्यानंतर त्यानं अनेक कलाकारांना आपल्या ॲक्शन चित्रपटांमध्ये कास्ट केलं. रणवीर सिंगबरोबर हिट 'सिम्बा' केल्यानंतर रोहितनं 'सिम्बा 2' ची तयारी केली आहे. हा चित्रपट 1 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • सिंघम अगेन : रोहित शेट्टीची सिंघम फ्रँचायझी अव्वल आहे. अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ स्टारर 'सिंघम अगेन' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' हा चित्रपट रिलीज होईल.
  • राकेश मारिया बायोपिक: रोहित शेट्टीची कॉप युनिव्हर्समध्ये हिट ठरला आहे. आता तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा बायोपिकही त्यांच्या कॉप युनिव्हर्समध्ये बनवणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details