मुंबई Rhea Chakraborty :अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी गेली काही वर्षे खूप खडतर गेली होती. तिला सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर ती अंमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात अटकेत होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)नं तिची कसून चौकशी केली. सुशांतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान रियासंबंधित अनेक गोष्टी समोर आल्या. यानंतरही तिच्या आयुष्यात काही ना काही समस्या निर्माण होत राहिल्या.
रिया चक्रवर्तीनं शेअर केले फोटो :दरम्यान तिच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे. नुकतेच तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये एक हिंट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रिया लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ती सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. हे सुंदर फोटो शेअर करताना रियानं लिहिलं, "हॅशटॅग चॅप्टर 2." यावर तिनं फ्लॉवर, हार्ट आणि इंद्रधनुष्य इमोजी पोस्ट केले आहेत. आता रिया तिच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं दिसत आहे.