मुंबई- हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत एरियल अॅक्शन असलेला 'फायटर' चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने याही चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच दाद मिळत असून आता सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जीडी बक्षी यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता हृतिकनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निवृत्त मेजर यांनी फायटरचे मनापासून कौतुक केलं - जीडी बक्षी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर चित्रपटाचे गुणगान करणारी पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटामुळे आपण खूप प्रभावित झालो असल्याचे निवृत्त मेजर यांनी म्हटलंय. आपल्या हुतात्म्यांना ही अप्रतिम श्रद्धांजली असल्याचं ते म्हणाले. या चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी लिहिलंय, "मी फायटर चित्रपट पाहिला, आमच्या हवाई योद्ध्यांना महान श्रद्धांजली. सुखोई सैनिकांचे महान कार्य पाहायला चुकवू नका, हृतिक रोशनने उत्कृष्ट फायटर पायलट तयार केला आहे. यात त्यानं टॉम क्रूझलाही दिली खडतर स्पर्धा दिली आहे, जरूर पहा. "
हृतिक रोशननं व्यक्त केली कृतज्ञता - 'फायटर' चित्रपटाचा मुख्य अभिनेता हृतिक रोशन निवृत्त जनरल यांच्या कौतुकाने आनंदित झाला आहे. ह्रतिकने त्याच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिलंय, "सर, चित्रपटाबद्दल तुमचा अभिप्राय मिळाल्याने मी धन्य झालो, तुमचे खूप खूप आभार."
25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झालेल्या 'फायटर' या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन 24.60 कोटी रुपये होते आणि पहिल्या दिवशी जगभरात 37.6 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते. हा चित्रपट आज 8 फेब्रुवारी रोजी रिलीजच्या 15 व्या दिवशीही थिएटरमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटाची एकूण जागतिक कमाई 325 कोटींच्या पुढे गेली आहे.
कोण आहेत रिटायर्ड आर्मी जनरल जीडी बक्षी? - मेजर जनरल डॉ. गगनदीप बक्षी हे निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी आणि लेखक आहेत. ते 'जी डी बक्षी' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये भारतीय सैन्याची सेवा कोली.कारगिल युद्धात बटालियनचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. त्यांनी इंग्रजी भाषेत बोस अॅन इंडियन समुराई नावाचे पुस्तकही लिहिले आहे. सरस्वती सिव्हिलायझेशन हे पुस्तक लिहून, त्यांनी भारताची सर्वात जुनी सभ्यता सिद्ध होण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.. त्यांनी नंतर जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी-पुंछ जिल्ह्यांमध्ये बंडविरोधी कारवाया करताना रोमियो फोर्स चे नेतृत्व केले आणि या प्रदेशातील सशस्त्र बंडखोरी दडपण्यात त्यांना यश आले. त्यांनी महासंचालनालयात दोन वेळा काम केले आहे. मिलिटरी ऑपरेशन्स आणि हेडक्वार्टर नॉर्दर्न कमांड (भारत) येथे ते पहिले BGS (IW) होते जिथे त्यांनी माहिती युद्ध आणि मनोवैज्ञानिक ऑपरेशन्स हाताळले. त्यांना लष्कर आणि संरक्षण संबंधित विषयांवर मते प्रदान करण्याची संधी देण्यात आली. त्यांना भारतातील अनेक वृत्तवहिन्यांवर युद्ध विषयक तज्ञ म्हणून बोलवण्यात येते.
हेही वाचा -
- विराट कोहलीची नक्कल करताना शाहिद कपूरचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
- दीपिका पदुकोणने विमानतळावर दाखवली, 'वेड्या बहिणीची वेडी माया'
- "एक स्वप्न सत्यात उतरले ": ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर शंकर महादेवनची भावना