मुंबई - Rekha Jamal Kudu Dance : दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल' या चित्रपटानं गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला होता. याशिवाय बॉबीचं 'जमाल कुडू' हे गाणं देखील खूप हिट झालं होतं. दरम्यान सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रेखा तिच्या 1988 मध्ये आलेल्या 'बीवी है तो ऐसी' मधील 'जमाल कुडू' मधील 'बॉबी' गाण्यावरची डान्स स्टेप करताना दिसत आहे. आता रेखावर अनेकजण कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
'जमाल कुडू'ची सिग्नेचर स्टेप : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, बॉबी देओलची 'जमाल कुडू' सिग्नेचर स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. रेखानं 1988 मध्ये आलेल्या 'बीवी है तो ऐसी' या चित्रपटातील 'सासू जी तूने मेरी कदर ना जानी' या गाण्यात पहिल्यांदा या डान्स स्टेपचा वापर केला होता. क्लिपमध्ये रेखा डोक्यावर ग्लास घेऊन नाचताना दिसत होती. दरम्यान बॉबीनं या स्पेपला आधुनिक टच दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, "कदाचित सोशल मीडिया त्यावेळी एवढा सक्रिय नव्हता, त्यामुळे ही स्टेप व्हायरल झाली नाही."