महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna and Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या सेटवर लाल साडीत पोहोचली रश्मिका मंदाना, पाहा फोटो - Rashmika Mandanna and Pushpa 2

Rashmika Mandanna and Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या सेटवरचा रश्मिका मंदाना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती वधूच्या वेशभूषेत दिसत आहे.

Rashmika Mandanna and Pushpa 2
रश्मिका मंदाना आणि पुष्पा 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 12:55 PM IST

मुंबई - Rashmika Mandanna and Pushpa 2 :साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची अनेकजण खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटावर आता वेगानं काम सुरू आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. आता रश्मिका मंदान्ना तिच्या भागाचे शूटिंग करताना दिसत आहे. रश्मिकाचे 'पुष्पा 2'च्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. फोटोत तिची वेशभूषा ही एखाद्या वधू सारखी आहे.

'पुष्पा 2'च्या सेटचा रश्मिकाचा फोटो व्हायरल :लाल सिंदूर, कानात आणि गळ्यात सोन्याचे दागिने घातलेल्या रश्मिकाचा लूक हा खूप सुंदर दिसत आहे. 'पुष्पा' चित्रपटात मध्ये रश्मिकानं 'श्रीवल्ली'ची भूमिका साकारली आहे. यात ती पुष्पा राजची पत्नी होती. या चित्रपटामध्ये 'श्रीवल्ली' भूमिका खूप पसंत केली गेली होती. हा चित्रपट लाल चंदन तस्कारीवर आधारित होता. दरम्यान याआधी 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचे एक पोस्टर व्हायरल झालं होतं. या पोस्टरमध्ये तो साडीत दिसला होता, त्याचा हा लूक खूपच वेगळा होता. यानंतर 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढू लागली होती. अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2'कडून खूप अपेक्षा आहेत.

अल्लू अर्जुन पोहोचला विशाखापट्टणमला : आता काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन विशाखापट्टणमला पोहोचला होता. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. सुकुमार आता या चित्रपटच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. अल्लू अर्जुनला 'पुष्पा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान रश्मिका मंदान्ना शेवटी 'ॲनिमल' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं रणबीर कपूरबरोबर स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.

हेही वाचा :

  1. Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा
  2. Ananya Panday : अनन्या पांडेचा पाहायला मिळणार एक अनोखा संघर्षमय प्रवास, 'कॉल मी बे'चा फर्स्ट लूक रिलीज
  3. S S Rajamouli : एस.एस.राजामौली यांनी जपानच्या 'आरआरआर' स्क्रिनिंगमध्ये केली सीक्केलची पुष्टी

ABOUT THE AUTHOR

...view details