मुंबई - Ranveer Singh and Deepika padukone :नाग अश्विनचा सायन्स-फिक्शन 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांसारखे स्टार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये पोहोचले. त्यांच्यासाठी एक स्पेशल स्क्रीनिंग होती. यावेळी रणवीर सिंगबरोबर दीपिका पदुकोणची सासू आणि वहिनीही उपस्थित असल्याचं दिसल्या.
'कल्की 2898 एडी' दीपिका आणि रणवीरनं पाहिला : 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिका आईची (सुमती) भूमिका साकारत आहे. सर्वजण तिच्या अभिनयाचे सध्या कौतुक करत आहेत. खऱ्या आयुष्यातही दीपिका लवकरच आई होणार आहे. दीपिका आणि रणवीरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर हा दीपिकाचा हात पकडून कारच्या दिशेन जाताना दिसत आहे. यावेळी दीपिकानं पांढऱ्या ओव्हरसाईज टी-शर्टवर काळ्या पट्टीच्या ब्लेझरसह ब्लू डेनिम जीन्स परिधान केला होता. लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी दीपिकानं मोकळे केस आणि चष्मा घातला होता. दुसरीकडे रणवीर सिंगनं आपल्या स्वॅगनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या रंगाच्या पोशाखात तो खूपच डॅशिंग दिसत होता.