महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Randeep Hooda Transformation :सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डानं घटवलं वजन - Randeep Hooda Transformation

Randeep Hooda Transformation : रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट हा 22 मार्च रोजी रिलीज होणार आहे. आता सोशल मीडियावर रणदीपचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खूप बारीक दिसत आहे.

Randeep Hooda Transformation
रणदीप हुडा ट्रान्सफॉर्मेशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 5:38 PM IST

मुंबई - Randeep Hooda Transformation :अभिनेता रणदीप हुड्डा सध्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पणासाठी चर्चेत आहे. त्याचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हा वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे. मोठ्या पडद्यावर ही भूमिका चांगल्या पद्धतीनं आणण्यासाठी रणदीप खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी रणदीपनं शारीरिक परिवर्तन करून चाहत्यांना थक्क केलं आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रणदीपला ओळखणे कठीण होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत रणदीपनं लिहिलं 'काला पानी'. रणदीपच्या या फोटोवरून असे दिसून येते की, काला पानीच्या शिक्षेदरम्यान सावरकर खूप बारीक झाले होते. हे दृश्य खऱ्यात आणण्यासाठी रणदीपनं आपले वजन खूप कमी केलं असल्याचं दिसत आहे.

रणदीप हुड्डाचं केलं चाहत्यांनी कौतुक : रणदीप हुड्डानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण आता कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''तुम्ही खूप या भूमिकेबद्दल खूप समर्पित आहात.'' दुसऱ्यानं लिहिलं, ''तुझा फोटो पाहून मला छान वाटलं.'' आणखी एकानं लिहिलं, ''रणदीप प्रत्येक भूमिकेमध्ये आपला जीव ओतत असतो.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. सोशल मीडियावर चाहते त्याच्या समर्पणाचे खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये रणदीप व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अमित सियाल, अपिंदरदीप सिंग आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : रणदीप हुड्डा स्टारर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुडा आणि योगेश राहर निर्मित आणि रुपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती यांच्या सह-निर्मित या चित्रपटात हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता नुकतेच रणदीप आणि अंकिता एकत्र दिसले होते. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. रणदीप हुड्डाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट होईल अशी अपेक्षा निर्माते करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. Elvish yadav : एल्विश यादवनं रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्या प्रकरणी दिली कबुली, वाचा बातमी
  2. Shweta Bachchan : श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेक बेपत्ता
  3. Arbaaz Confirms Dabangg 4 : अरबाजचा 'दबंग 4' निर्मितीसाठी दुजोरा, मात्र अ‍ॅटलीशी भेटीचे केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details