मुंबई - Ranbir Kapoor :अभिनेता रणबीर कपूरनं नुकतेच सूरतमध्ये एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या व्हिडिओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमानंतर शोरुमधून बाहेर पडताना त्याला एका उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. शोरूममधून बाहेर पडत असताना रणबीर जेव्हा पायऱ्यांवरून खाली येत होता, तेव्हा तो पापाराझीला फोटोसाठी पोझ देत होता. यानंतर तो चालत असताना लगेच पायऱ्यांवर कोसळला. मात्र त्यानं तोल सावरला. आता हा व्हिडिओ पापाराझीनं त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल : आता रणबीरच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, "आता पापाराझी रणबीरबरोबर बाथरुममध्ये देखील कॅमेरा घेऊन जाणार आहेत." दुसऱ्या एकानं लिहिलं, "रणबीर हा खाली कोसळला असता तर त्याचा देखील यांनी व्हिडिओ काढून पोस्ट केला असता." आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, "अरे भावा पडू नको. नाहीतर शुटिंग बंद होईल." याशिवाय काहीजण रणबीरला बरोबर चालण्याचादेखील सल्ला देताना दिसत आहेत. दरम्यान रणबीर सध्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाचे शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये तो श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत असणार आहे.