महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर पहिला चित्रपट 'सावरिया'च्या अपयशानं खूश, म्हणाला- 'यामुळे आणखी मजबूत झालो' - ranbir kapoor and saawariya Movie - RANBIR KAPOOR AND SAAWARIYA MOVIE

Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं एका मुलाखतीत त्याच्या 'सावरिया' या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं केलं आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की, 'सावरिया'च्या फ्लॉपमुळे मी आणखी जास्त मजबूत झालो आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर ((फाईल फोटो- आईएएनएस))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 6:41 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं संजय लीला भन्साळीच्या 'सावरिया' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट भन्साळींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. दरम्यान 'सावरिया' चित्रपट फ्लॉप होणं योग्यच होतं, असं रणबीर कपूरचं मत आहे. आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं याबद्दल आपले मत व्यक्त केलं आहेत. रणबीरनं यावेळी सांगितलं की, तो संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर त्याचा रिज्यूमे घेऊन बसला होता. याशिवाय त्यानं आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

रणबीर कपूर 'सावरिया'वर केलं विधान :रणबीरनं पुढं सांगितलं, "मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जेव्हा मला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते, तेव्हा मी संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा मी परदेशातून परत आलो, तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला मला लॉन्च करायचे होते. पण मी संजय लीला भन्साळी यांचा खूप मोठा चाहता होतो. मला वाटलं, कदाचित ते मला ओळखत नसेल. म्हणून मी माझा रिज्यूमे तयार करून त्याच्या ऑफिसबाहेर बसलो. यानंतर मी भन्साळींबरोबर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. यामध्ये मला खूप त्रास सहन करावा लागला, मात्र तरीही मी हिम्मत हारला नाही. यात मी आणखी मजबूत झालो. त्यांनी माझा रिज्यूमे पाहिला आणि मी कोण आहे हे त्यांनी ओळखले. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते म्हणाले मला तुझ्याबरोबर एक चित्रपट बनवायचा आहे."

रणबीर पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीबरोबर करणार काम : यानंतर रणबीरनं पुढं म्हटलं, "आता जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला आनंद होतो की बर झालं की 'सावरिया' चित्रपटानं काही विशेष कामगिरी केली नाही. कारण यामुळे मी पुढील आयुष्यासाठी तयार आणि मजबूत झालो. संजय यांनी मला खूप छळलं. ते खूप कठोर होते, मी सेटवर गुडघ्यावर बसलो होतो, तेव्हा त्यांनी मला मारले होते. काही काळानंतर मला इतका त्रास झाला की, मला वाटलं की हा चित्रपट सोडून द्यावा. मला काम करून 10 किंवा 11 महिने झाले होते, यानंतर मला असे म्हणावं वाटलं, की मी हे करू शकत नाही. त्यांनी मला खूप रागावलं आहे." मात्र, आता सर्व काही विसरून रणबीर हा संजय लीला भन्साळीबरोबर काम करणार आहेत. त्यांचा 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्याबरोबर त्याची पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टची मुलगी राहा वडील रणबीर कपूरबरोबर झाली स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor
  2. दिनेश कार्तिकनं क्रिकेटर्सच्या बायोपिकसाठी 'या' अभिनेत्यांचं सुचवलं नाव... - dinesh karthik
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधला रणबीर कपूरची मुलगी 'राहा'चा गोड फोटो व्हायरल - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA

ABOUT THE AUTHOR

...view details