महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर कपूरचा वाढदिवस झाला भव्य, आकाश अंबानींपासून ते अर्जुन कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी - Ranbir Kapoor Birthday - RANBIR KAPOOR BIRTHDAY

Ranbir Kapoor Birthday: रणबीर कपूरनं 28 सप्टेंबरला त्याचा 42वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांच्या घरी रात्रभर पार्टी चालली, यामध्ये आदित्य रॉय कपूर,अर्जुन कपूर यांसारखे स्टार्स कलाकार उपस्थित होते. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीदेखील या पार्टीला हजर होता.

Ranbir Kapoor Birthday
रणबीर कपूरचा वाढदिवस (रणबीर कपूरचा वाढदिवस (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 12:47 PM IST

मुंबई - Happy Birthday Ranbir Kapoor : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आज 28 सप्टेंबर रोजी 42वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्तानं त्यानं त्यांचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केलाय. वाढदिवसाच्या पार्टीसाठी रणबीरनं फक्त त्याच्या जवळच्या मित्रांना आमंत्रित केलं होतं. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत रणबीरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनच सुरू होते. या सेलिब्रेशनमध्ये अनेक सेलिब्रिटी रणबीरच्या घरी येताना दिसले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रणबीर कपूरची आई नीतू कपूर त्याच्या घरी पोहोचली होती. याशिवाय मुकेश अंबानी आणि यांचा मुलगा आकाश अंबानीनेही रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली होती.

'या 'बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दर्शवली :अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी शुक्रवारी रात्री रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. रणबीर कपूर 28 सप्टेंबर रोजी 42 वर्षांचा झाला. शुक्रवारी रात्री त्यानं आपल्या निवडक मित्रांबरोबर घरी वाढदिवस साजरा केला. रणबीरचा जवळचा मित्र आकाश अंबानी हा त्याच्या घराबाहेर स्पॉट झाला. 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात रणबीरबरोबर काम केलेला आदित्य रॉय कपूर या पार्टीत दिसला. याशिवाय अर्जुन कपूर रणबीरच्या घरी पोहोचताना दिसला.

आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमानं सेलिब्रेशनची झलक दाखवली :रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरनं तिच्या सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे. रणबीर कपूरबरोबरचे केक कापतानाचा फोटो तिनं शेअर केले आहेत. तिचा आणि रणबीरच्या बालपणीच्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं की, 'माझ्या छोटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्यावर खूप प्रेम आहे.' रणबीरची आई नीतू कपूरनंदेखील रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुला जे पाहिजे आहे ते सर्व मिळो.' दरम्यान, रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटी 'ॲनिमल'मध्ये दिसला होता. हा चित्रपट संदीप वंगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये त्याच्याबरोबर रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर, असे स्टार्स दिसले होते. आता त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास पुढं तो नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात साऊथ अभिनेत्री साई पल्लवीबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा झाली आजी नीतू कपूरला पाहून सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor
  2. बॉक्स ऑफिसवर 'किंग' विरुद्ध 'लव्ह अँड वॉर', 19 वर्षांनंतर शाहरुख आणि रणबीरमध्ये होईल संघर्ष - SRK and Ranbir Kapoor
  3. रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date

ABOUT THE AUTHOR

...view details