मुंबई - Ranbir-Alia and Jr NTR Dinner Date : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या मुंबईत त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ज्युनियर एनटीआर गेल्या रविवारी रात्री हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींबरोबर डिनर डेटवर दिसला होता. बी-टाऊनचे सर्वात प्रसिद्ध जोडपे रणबीर कपूर-आलिया भट्ट, हृतिक रोशन-सबा आझाद आणि करण जोहर मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी सामील झाले होते. ज्युनियर एनटीआरनं हृतिक रोशन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि करण जोहर यांच्याबरोबर डिनर डेटचा आनंद घेतला. आपल्या व्यग्र शूटिंग शेड्यूलमधून ब्रेक घेऊन त्यानं या स्टार्सबरोबर काही विशेष वेळ घालवला.
साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर दिसला डिनर डेटवर : दरम्यान रणबीर-आलिया, ज्युनियर एनटीआरनं पत्नी लक्ष्मी प्रणती यांनी चित्रपट निर्माता करण जोहरसह रेस्टॉरंटमध्ये स्टायलिश अंदाजात एन्ट्री केली. या स्टार्सच्या आगमनानंतर काही वेळातच हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद या ठिकाणी आले. व्यग्र शेड्यूल असूनही, हे स्टार्स वांद्रे येथील एका हाय-एंड रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी एकत्र आले होते. आता त्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे स्टार्स करण जोहरबरोबर नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचा अनेकजण अंदाज लावत आहेत. या सगळ्यावर स्टार्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अयान मुखर्जी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ॲक्शन चित्रपट 'वॉर 2'च्या शुटिंगसाठी सज्ज झाले आहेत.