हैदराबाद- साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार राम चरणने त्याच्या आगामी 'आरसी 16' या चित्रपटाची तयारी केली आहे. चित्रपटाचा पूजा सोहळा आज 20 मार्च रोजी पार पडला. 'आरसी 16' चित्रपटाच्या मुहूर्ताच्या पूजा समारंभात राम चरण, जान्हवी कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू दिसत आहेत. 'आरसी 16' च्या पूजा समारंभासाठी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट येथे पोहोचली होती. याशिवाय 'आरसी 16' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एआर रहमान आणि ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनीही येथे हजेरी लावल्यानं या कार्यक्रमाचे आकर्षण वाढले होते.
राम चरणचे मेगास्टार वडील चिरंजीवी, राम चरणचा आणखी एक आगामी चित्रपट 'गेम चेंजर' चे दिग्दर्शक शंकर, जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर, अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनीही 'आरसी 16' च्या या समारंभात उपस्थिती दर्शवली होती.
'आरसी 16' च्या पूजा समारंभात जान्हवी कपूरने हलक्या हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि ती या पूर्ण देसी लूकमध्ये सुंदर दिसत होती. तर, अभिनेता राम चरण पूर्ण पांढऱ्या पोशाखातील लूकमध्ये दिसत आहे. मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती वृद्धी सिनेमा आणि सुकुमार रायटिंग्ज यांनी केली आहे. 'आरसी 16' च्या दिग्दर्शकाला 'उपन्ना' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
साऊथमध्ये चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करत असताना शीर्षकाची घोषणा अनेकदा गुलदस्त्यात ठेवण्यात येते. नायकाच्या नावाची आद्याक्षरे व त्याच्या चित्रपटाची संख्या याचा विचार करुन असे वर्कींग टायटल बनवण्यात येते. आता उदाहर्णार्थ 'आरसी' म्हणजे राम चरण आणि त्याचा हा 16 वा चित्रपट असल्याने 'आरसी 16' असे याचे शीर्षक ठेवण्यात आलंय. हे तात्पुरते शीर्षक असून शीर्षकाची घोषणा करताना त्याची खूप चर्चा होईल अशा प्रकारच्या इव्हेन्टचे आयोजन केले जाईल. राम चरण हा तेलुगूमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता आहे. त्यानं 'मगधीरा' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. भव्य व्हीएफएक्स इफेक्ट्स पहिल्यांदाच या चित्रपटातून पाहायला मिळाले . याचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं होतं. या चित्रपटाला अफाट लोकप्रियता लाभली. त्यानंतर राम चरणचा अभिनेता म्हणून झालेला उदय विकसीत होत गेला. त्यानं 'जंजीर' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं मात्र त्याला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मग तो शांतपणे तेलुगू आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये कार्यरत राहिला. अलिकडे त्याचा 'आरआरआर' हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर त्याला जगभर मान्यता मिळाल्यानं रामचरण आता ग्लोबल स्टार बनला आहे.
हेही वाचा -
- Thalapathy Vijay : 'गोट'च्या शुटिंगसाठी केरळमध्ये आलेल्या थलपथी विजयला पाहायला आले लाखोच्या संख्येत चाहते
- Ilaiyaraaja biopic : संगीतकार इलैयाराजा यांच्या बायोपिकची घोषणा, धनुष साकारणार संगीताच्या जादुई 'मॅस्ट्रो'ची भूमिका
- 'डॉन 3' चित्रपटासाठी चर्चेत असलेली शोभिता धुलिपालानं प्रियांका चोप्राबरोबरचा फोटो केला शेअर